रव्याचे आप्पे

साहित्य :
  • २ वाट्या साधा रवा
  • १ मूठ चणाडाळ
  • १ वाटी जाडे पोहे
  • एक ते दीड वाटी आंबट ताक
  • १/४ चमचा हळद
  • १/२ वाटी मक्याचे दाणे हवे असल्यास
  • १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ चमचा आले- मिरची पेस्ट
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार
कृती:

१) रवा, पोहे, चणाडाळ एकत्र करून धुवून घ्यावे व सगळे पाणी काढावे.

२) त्यात दिड वाटी ताक घालावे. गरज वाटल्यास अजुन थोडे घालावे. मिश्रण इडली पिठाप्रमाणे घट्ट झाले पाहिजे. मिश्रण एकत्र करावे.

३) ५ ते ६ तास झाकून ठेवावे. मिश्रण चमच्याने पडेल असे सैलसर असावे.



४) आप्पे करताना त्यात आले- मिरचीची पेस्ट, मीठ, मक्याचे दाणे (हवे असल्यास), बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सगळे मिश्रण एकत्र करावे.

५) आप्पे पात्राला थोडेसे तेल लावावे. आप्पेपात्र तापले की, एक एक चमचा मिश्रण घालुन झाकण ठेवावे. एका बाजुने तयार झाल्यावर उलटावे दुसऱ्या बाजुने शेकावे.



६) डिश मध्ये काढावे. नारळाच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो साँस बरोबर सर्व्ह करावे.

( आप्पे करताना आप्पे पात्र नॉन- स्टिकचे असावे त्यात आप्पे चिकटत नाहीत सहज निघतात.)









Comments

Post a Comment

Popular Posts