पालक पुरी
साहित्य:
कृती:
१) सर्वप्रथम पालक धुवा व चिरा. त्यात १/२ वाटी पाणी घालुन पालक पेस्ट करून घ्या. (पालक पेस्ट करतांना पाण्याचा वापर कमी करा म्हणजे पुरीचा रंग जास्त हिरवा राहिल.)
२) पालकाच्या पेस्टमध्ये लसुण- मिरचीची पेस्ट, धनेपुड, हळद, लाल तिखट, तीळ, मीठ घाला व मिश्रण एकत्र करा.
३) तयार मिश्रणात १ चमचा चणाडाळीचे पीठ व आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ घाला. १-२ चमचे गरम तेलाचे मोहन घाला वपाणी न वापरता पालकाच्या पेस्ट मध्ये मावेल इतके गव्हाचे पीठ घालुन घट्ट कणिक भिजवुन घ्या.
४) तयार कणिकेचे छोटे गोळे करून पु-या लाटुन घ्या.
५) कढईत तेल तापवुन पु-या तळा.
चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा.
- निवडलेला पालक १ जुडी
- गव्हाचे पीठ आवश्यकतेनुसार
- १ चमचा चणाडाळीचे पीठ
- २-३ हिरव्या मिरच्या व ५-६ लसुण पाकळ्या एकत्र करून पेस्ट करा.
- १ चमचा धनेपुड
- १/२ चमचा हळद
- १/२ चमचा लाल तिखट
- १ टे. स्पुन तीळ
- मीठ चवीनुसार
- तळण्याकरिता तेल
कृती:
१) सर्वप्रथम पालक धुवा व चिरा. त्यात १/२ वाटी पाणी घालुन पालक पेस्ट करून घ्या. (पालक पेस्ट करतांना पाण्याचा वापर कमी करा म्हणजे पुरीचा रंग जास्त हिरवा राहिल.)
२) पालकाच्या पेस्टमध्ये लसुण- मिरचीची पेस्ट, धनेपुड, हळद, लाल तिखट, तीळ, मीठ घाला व मिश्रण एकत्र करा.
३) तयार मिश्रणात १ चमचा चणाडाळीचे पीठ व आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ घाला. १-२ चमचे गरम तेलाचे मोहन घाला वपाणी न वापरता पालकाच्या पेस्ट मध्ये मावेल इतके गव्हाचे पीठ घालुन घट्ट कणिक भिजवुन घ्या.
४) तयार कणिकेचे छोटे गोळे करून पु-या लाटुन घ्या.
५) कढईत तेल तापवुन पु-या तळा.
चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment