शेवयांचा उपमा

साहित्य:
  • २ वाट्या शेवया (बॉम्बीनोच्या वापरल्या तरी चालतील )
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • ८-१० कडिपत्याची पाने
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेला टोमॅटो
  • ३-४ टे.स्पुन तेल
  • फोडणीकरिता थोडसं जिरं, थोडी मोहरी, थोडीशी हळद, चिमुटभर हिंग
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • १/२ चमचा  साखर
  • १/२ वाटी तळलेले शेंगदाणे
  • १ वाटी खरवडलेला  नारळ
  • थोडीशी चिरलेली कोथिंबीर ( ऐच्छिक)
  • मीठ चवीनुसार
कृती:

१) एका कढईत तेल तापवा. त्यात जिरं, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरचीचे तुकडे, कडिपत्याची पाने, बारीक चिरलेला कांदा घाला व परता. कांदा लालसर झाला की, त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालुन परता.  तेल सुटू लागले की, त्यात शेवया घालुन गुलाबीसर रंगावर परतुन घ्या.

२) एका पातेलीत ३-४ वाट्या पाणी उकळवा व हे पाणी शेवयांवर ओता. शेवया बुडतील इतकेच पाणी घाला. 

३) लिंबाचा रस, साखर, थोडा खरवडलेला नारळ व चवीनुसार मीठ घाला. झाकण ठेवुन मध्यम आंचेवर एक वाफ द्या. २-३ मिनिटांनी झाकण काढा. सगळे पाणी आटवा शेवया शिजल्या पाहिजेत जरूर वाटल्यास पुन्हा थोडे पाणी घाला. (प्रमाणात पाणी घाला जास्त पाणी घातले तर शेवयांचा गिच्च गोळा होईल.) 

४) डिशमध्ये सर्व्ह करतांना त्यावर तळलेले शेंगदाणे,खरवडलेला नारळ घाला व आवडत असल्यास चिरलेली कोथिंबीर घालुन सर्व्ह करा.














Comments