कोबीचे थालीपीठ / भानोले
माझ्या आईने शिकवलेली व माझ्या आवडीची पाककृती देत आहे.
साहित्य :
- बारीक चिरलेला कोबी ३ वाट्या
- बारीक चिरलेला कांदा दिड वाटी
- खरवडलेला नारळ १ वाटी
- बारीक चिरलेली कोथिंबीर १/२ वाटी
- चणाडाळीचे पीठ (बेसन) आवश्यकतेनुसार
- १-२ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- हळद, हिंग, थोडेसे लाल तिखट, मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
कृती :
१) प्रथम एका भांड्यात चिरलेला कोबी, कांदा ,चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर, मीठ, हळद, हिंग, लाल तिखट व एकत्र करा.
२) थोडे पाणी सुटले की, त्यात चणाडाळीचे पीठ घाला. गरज वाटली तर अगदी थोडेसे पाणी वापरा. थालिपीठाचे पीठ भिजवतो तसे भिजवा.
३) १-२ चमचे तेल घालुन पीठ भिजवून घ्या.
४) तव्याला तेल लावून तयार पिठाचे थालीपीठ लावा. झाकण ठेवा. २-३ मिनिटांनी झाकण काढुन थालीपीठ उलटुन भाजुन घ्या. थोडे थोडे तेल तव्यावर सोडुन दोन्ही बाजुने भाजुन घ्या.
५ ) गरम-गरम तुप घालुन सर्व्ह करा .
Comments
Post a Comment