काॅर्न-टोस्ट सँडवीच

साहित्य:

  • स्लाइस ब्रेड आवश्यकतेनुसार
  • उकडलेले (काॅर्न) मक्याचे दाणे २ मध्यम वाटया
  • मेयाॅनीज साॅस ५-६ टे. स्पून 
  • चिली फ्लेक्स १ /४ टी. स्पून किंवा आवडीनुसार
  • ओरीगॅनो १/४ टी. स्पून
  • मिरपूड १/४ टी. स्पून
  • मीठ चवीनुसार
  • बटर आवश्यकतेनुसार

कृती:

१) एका बाऊलमध्ये उकडलेले मक्याचे दाणे घ्या. त्यात मेयाॅनीज साॅस, १/४ टी. स्पून चिली फ्लेक्स, १/४ टी. स्पून ओरीगॅनो, १/४ टी. स्पून मिरपूड व चवीनुसार मीठ घाला. सगळे मिश्रण एकत्र करा. 

२) ब्रेडला बटर लावा. १ चमचा तयार मिश्रण ब्रेडवर पसरवुन घ्या. बटर लावलेला दुसरा ब्रेड लावुन घ्या. वरून दोन्ही बाजुने ब्रेडला बटर लावा.

३) टोस्टरमध्ये सँडवीच टोस्ट करून घ्या.

४) चटणी किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा.









Comments

Popular Posts