पोळीचे चिप्स
बहुतेक जणांना माहित असावा पण मला आवडणारा पदार्थ. मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा भुक लागली की, पटकन देता येईल असा व घरात उपलब्ध असणा-या साहित्यापासुन तयार होणारा पदार्थ.
साहित्य:
कृती:
१) प्रथम पोळी अर्धी करा व कात्रीने किंवा हाताने पोळीचे उभे तुकडे करून घ्या.
२) एका कढईत तेल तापवुन त्यात पोळीचे उभे तुकडे लालसर रंगावर तळुन घ्या व एका भांड्यात काढा.
३) तयार तळलेल्या पोळीच्या तुकड्यांवर लाल तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला (ऐच्छिक) भुरभुरवुन घ्या.
४) चिप्स खाली-वर करून घ्या म्हणजे पोळीच्या चिप्सना सगळीकडे लाल तिखट व मीठ लागेल.
४) तयार पोळीचे चिप्स् सर्व्ह करा.
साहित्य:
- २-३ तयार पोळ्या /चपात्या (ताज्या किंवा शिळ्या पोळ्या सुध्दा चालतील.)
- थोडेसे तिखट
- मीठ चवीनुसार
- थोडासा चाट मसाला (ऐच्छिक)
- तळण्यासाठी तेल आवश्यकतेनुसार
कृती:
१) प्रथम पोळी अर्धी करा व कात्रीने किंवा हाताने पोळीचे उभे तुकडे करून घ्या.
२) एका कढईत तेल तापवुन त्यात पोळीचे उभे तुकडे लालसर रंगावर तळुन घ्या व एका भांड्यात काढा.
३) तयार तळलेल्या पोळीच्या तुकड्यांवर लाल तिखट, चवीनुसार मीठ, चाट मसाला (ऐच्छिक) भुरभुरवुन घ्या.
४) चिप्स खाली-वर करून घ्या म्हणजे पोळीच्या चिप्सना सगळीकडे लाल तिखट व मीठ लागेल.
४) तयार पोळीचे चिप्स् सर्व्ह करा.
Comments
Post a Comment