मोकळी भाजणी / मोकळ
माझी आई व बाबा दोघेही उत्तम स्वयंपाक करायचे. आज अशी एक रेसिपी की, जी मी माझ्या बाबांनकडून शिकले आहे. खुप जणांना माहिती असावी पण तरी सुद्धा मला शेअर करावीशी वाटली. पूर्णपणे पौष्टिक व पोटभर अशी डिश. थालिपीठाची भाजणी बहुतेक सगळ्यांनकडे असते व बाकी लागणारे साहित्य देखील घरात असतेच.थालीपीठ भाजणीची रेसिपी सुध्दा देत आहे. थोडीशी आंबट-गोड अशी लागणारी व आम्हा सर्वांना आवडणारी रेसिपी.
थालीपीठ भाजणी
साहित्य:
- ५००ग्राम ज्वारी
- ५००ग्राम बाजरी
- २५०ग्राम तांदुळ
- २५०ग्राम हरभरे
- १२५ ग्राम हिरवे मुग
- उडीद १/२ वाटी
- मटकी १/२ वाटी
- मसुर १/२ वाटी
- गहु १/२ वाटी
- १२५ ग्राम धने
- मेथी दाणे १ टी .स्पून
- जिरं १ टी .स्पून
कृती:
१) वरील सगळी धान्ये भाजुन घ्यावी.
२) गिरणीतुन थोडीशी जाडसर दळावी.
२-३ महिने सहज टिकते. आवश्यकतेनुसार वापरावी. थालिपीठ भाजणी वापरून आपण मोकळी भाजणी, थालिपीठं तसेच घावन सुद्धा घालु शकतो. अतिशय पटकन व पौष्टीक असे पदार्थ पटकन करता येतात. त्यापैकी मोकळी भाजणी/ मोकळची पाककृती देत आहे.
मोकळी भाजणी/ मोकळ
साहित्य:
- ३ वाट्या थालीपीठाची भाजणी
- चिरलेला कांदा १ वाटी
- चिंचेचा कोळ १/२ वाटी
- २-३ हिरव्या मिरच्याचे तुकडॆ
- कढीपत्याची ८-१० पाने
- गुळ २ टे. स्पून
- लाल तिखट १ टी. स्पून
- ओवा १ टी. स्पून
- हळद १/४ टी. स्पून
- मोहरी १/४ टी. स्पून
- मीठ चवीनुसार
- हिंग थोडासा
- १/२ वाटी तेल
- खरवडलेला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीकरिता
कृती:
१) एका भांड्यात थालीपीठ भाजणी घ्या. त्यात लाल तिखट, मीठ, हळद, ओवा, थोडासा हिंग, गुळ, चिंचेचा कोळ व थोडीशी चिरलेली कोथिंबीर घाला. या मिश्रणात गार पाणी घालुन भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवा.
२) कढईत/पातेलीत तेल तापवून घ्या. फोडणीत मोहरी, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कढिपत्ता व चिरलेला कांदा घालुन परतून घ्या. कांदा परतुन झाल्यावर त्यात भिजवलेल्या भाजणीचे पीठ घालुन मिश्रण एकत्र करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. कढईवर झाकण ठेवा. ५-७ मिनिटे वाफ येऊ द्या. पुन्हा एकदा ढवळा व झाकुन ठेवा. ४-५ मिनिटे पुन्हा एक वाफ द्या. (अजून एखादी वाफ मिश्रण शिजण्यास आवश्यक असेल तर द्यावी. व्यवस्थित शिजवून घ्या कच्चे राहणार नाही याची काळजी घ्या.)
३) झाकण काढून मिश्रण ढवळा, कोरडे झाले की गॅस वरून खाली उतरवा.
४) डिशमध्ये काढा वरून चिरलेली कोथिंबीर व खरवडलेला नारळ घाला मस्तपैकी एक चमचा साजुक तूप घालुन गरम गरम सर्व्ह करा.
*मोकळी भाजणी करताना नेहमी जाड बुडाची कढई/पातेली घ्यावी.
waa !! mast
ReplyDeleteछान रेसिपी आहे
ReplyDeletehttp://www.puneriproperty.com
Thanku
ReplyDelete