चीझ पराठा व चीझ पुरी




साहित्य:

  • १-२ चीझचे क्युब
  • १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • थोडीशी मिरपूड
  • मीठ चवीनुसार
  • बटर किंवा तुप आवश्यकतेनुसार
  • १ मोठी वाटी गव्हाचे पीठ
  • थोडेसे  तेल

कृती:

१) चीझचे क्युब किसुन घ्या. त्यात १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर, थोडीशी मिरपूड व चवीनुसार मीठ घालुन मिश्रण एकत्र करा.        

२) १ वाटी गव्हाचे पीठ घ्या त्यात थोडे मीठ, तेल व पाणी घालुन थोडी सैलसर कणिक भिजवुन घ्या.

३) भिजवलेल्या कणकेचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करा व त्यात १-२ लहान चमचे चीझचे तयार मिश्रण भरुन वाटी बंद करा व पराठा लाटा.

४) तवा तापवून पराठा दोन्ही बाजुंनी शेका. आपल्या आवडीनुसार बटर किंवा तुप लावून शेका.

५) गरमा-गरम पराठा साॅस बरोबर सर्व्ह करा.

चीझ पुरी:


  • तयार साहित्यापासून चीझची पुरी सुध्दा छान होते. पुरी करतांना कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याची लहान वाटी तयार करून त्यात १ चमचा चीझचे तयार मिश्रण भरुन वाटी बंद करा व लहान पुरी लाटुन तेलात तळा. 











Comments

Popular Posts