कणकेचा शिरा

श्रावण महिना सुरु झाला. बहुतेक रोजच गोड पदार्थ जेवणात केले जातात. नैवेद्याकरता व  मुलांना डब्यात देता येण्यासारखा हा पौष्टिक पदार्थ आहे. 

साहित्य:

  • ३ वाट्या कणिक / गव्हाचे पीठ
  • ३ वाट्या पाणी
  • दिड वाटी साखर
  • १ वाटी साजुक तुप 
  • थोडीशी वेलची पुड
  • १०-१२ काजुचे तुकडे (ऐच्छिक)

कृती:

१) एका कढईत गव्हाचे पीठ कोरडेच भाजा. थोडा रंग बदलला की, थोडे-थोडे तुप घाला व गव्हाचे पीठ लालसर होईपर्यंत तुपावर खमंग भाजा. चांगला खमंग वास घरभर सुटला पाहिजे. थोडीशी वेलची पुड घाला. आवडत असल्यास काजुचे तुकडे घाला.

२) एका पातेलीत ३ वाट्या पाणी व दिड वाटी साखर घालुन पाणी गरम करून साखर विरघळून घ्या. (पाणी उकळु नका.)

३) गव्हाचे पीठ लालसर झाले की, साखरेचे पाणी घाला व मिश्रण एकत्र करून भराभर ढवळा व एक वाफ
द्या. थोडेसे तुप घालुन ढवळा.

४) गरमा-गरम सर्व्ह करा.

(तुपाचा वापर आवश्यकतेनुसार करा)






Comments

Popular Posts