हराभरा कबाब
साहित्य :
कृती :
१)पालकाची पेस्ट करावी व मटार सुध्दा मिक्सरमध्ये वाटुन घ्यावे.
२) एक भांड्यात उकडुन मॅश केलेले बटाटे, वाटलेले मटार व पालक पेस्ट, आले-लसुण-मिरची पेस्ट, मीठ, आमचूर, चिरलेली कोथिंबीर व ब्रेडचा चुरा घालुन मिश्रण एकत्र करावे.
३) गरज वाटल्यास थोडा ब्रेडचा चुरा घालावा.
४) वरील मिश्रणाला कटलेटचा आकार द्यावा. वरून काजुचा तुकडा लावावा. रव्यात कटलेट घोळवावे.
५) तव्यावर थोडे तेल घालुन कटलेट शॅलॊ फ्राय करावे.
६) टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे.
- १ वाटी वाफवलेला पालक
- १ वाटी वाफवलेले मटार
- ३-४ मध्यम बटाटे उकडून मॅश केलेले
- दिड ते दोन वाट्या ब्रेडचा चुरा
- एक ते दिड चमचा आले-लसुण- मिरची पेस्ट
- १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १/२ चमचा आमचूर पावडर
- पाऊण वाटी रवा कटलेट घोळवण्यासाठी
- थोडेसे काजुचे तुकडे वरून लावण्यासाठी
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
कृती :
१)पालकाची पेस्ट करावी व मटार सुध्दा मिक्सरमध्ये वाटुन घ्यावे.
२) एक भांड्यात उकडुन मॅश केलेले बटाटे, वाटलेले मटार व पालक पेस्ट, आले-लसुण-मिरची पेस्ट, मीठ, आमचूर, चिरलेली कोथिंबीर व ब्रेडचा चुरा घालुन मिश्रण एकत्र करावे.
३) गरज वाटल्यास थोडा ब्रेडचा चुरा घालावा.
४) वरील मिश्रणाला कटलेटचा आकार द्यावा. वरून काजुचा तुकडा लावावा. रव्यात कटलेट घोळवावे.
५) तव्यावर थोडे तेल घालुन कटलेट शॅलॊ फ्राय करावे.
६) टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे.
Masta
ReplyDelete