उपासाची मिसळ


आज माझ्या  मैत्रिणीने सांगितलेली उपासाच्या मिसळची रेसिपी खास तुमच्यासाठी 
साहित्य :




  • बटाट्याचा चिवडा /बटाटा शेव २०० ग्रॅम
  • गोड दही २-३ वाट्या
  • ३-४ (सालं काढुन केलेल्या )बटाट्याच्या फोडी
  • दिड वाटी भिजवलेले शेंगदाणे
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा जिरे
  • मीठ चवीनुसार
  • फोडणीकरिता साजुक तुप
  • सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :

)बटाट्याच्या फोडी व भिजवलेले शेंगदाणे कुकर मध्ये शिजवून घ्यावे.

२) वरील मिश्रणातील १/२ वाटी शिजवलेले शेंगदाणे बाजुला काढावेत. त्यात हिरव्या मिरच्या व पाऊण चमचा जिरे घालुन मिक्सरवर बारीक वाटावे.

३) एका भांड्यात शिजवलेले शेंगदाणे व बटाटे घ्यावे व त्यातील उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावेत.

४) कढईत साजुक तुप घालावे तुप तापल्यावर जिरे घालावे. त्यातच वाटलेले शेंगदाणे व हिरव्या मिरचीचे वाटण घालावे. १-२ मिनिटं परतुन घ्यावे. मॅश केलेल्या बटाट्याच्या व शिजवलेल्या शेंगदाण्याचे मिश्रण कढईत घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी.



५) तयार मिश्रणात थोडे पाणी घालुन उकळत ठेवावे. जरा आटल्यावर गॅस बंद करावा. हा मिसळीचा रस्सा तयार झाला. (मिसळीयोग्य रस्सा पातळ करावा.)



६) एका बाऊलमध्ये पाऊण वाटी बटाट्याचा चिवडा किंवा बटाट्याची शेव घाला. ३-४ (छोटे)चमचे गोड दही घाला. वरुन मिसळीचा तयार रस्सा आवडीप्रमाणे घाला. बारीक चिरलेली कोथींबीर घालुन सजवा.

७) थोडी हिरवी मिरची पेस्ट तयार ठेवा व आपल्याला तिखट आवडत असेल तर आवडीप्रमाणे मिसळीत घालुन तिखट मिसळीचा आस्वाद घ्या.

Comments

Popular Posts