व्हेजिटेबल कटलेट / Vegetable Cutlet
सर्व्हिंग: १५ ते १६ नग
लागणारा वेळ: -२५-३० मिनिटे
साहित्य:
- ५-६ बटाटे
- २-३ लाल गाजरं
- १ वाटी मटार
- १ मध्यम आकाराचे बीट
- १ मध्यम आकाराचा कांदा
- १ मध्यम आकाराचा टोमॅटो
- ५-६ स्लाईस ब्रेडचा चुरा
- १ टीस्पून आलं लसुण मिरची पेस्ट
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून धने पावडर
- १/२ टीस्पून जिरं पावडर
- १/४ टीस्पून मिरपूड
- चवीनुसार मीठ
- जाडा रवा आवश्यकतेनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
१) गाजर व बीटाची सालं काढून किसून घ्या. कांदा, आलं व मिरचीची पेस्ट करून घ्या.
२) टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३) एका कढईत तेल तापवून त्यात कांदा, आलं व मिरचीची पेस्ट घालून परता. त्यात वाटलेला टोमॅटो घालून परता व मटार घाला.
४) किसलेले गाजर व बीट घालून मिश्रण एकसारखे करून घ्या. कढईवर एक झाकण ठेवून मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. नंतर त्यात धने पावडर, गरम मसाला, जिरं पावडर, मिरपूड घालून मिश्रण एकत्र करून घ्या.
५) गाजर व बीट शिजल्यावर तयार मिश्रणात उकडलेले बटाटे मॅश करून घाला व त्यामध्ये ब्रेडचा चुरा व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. गॅस बंद करा.
६) मिश्रण कोमट झाल्यावर, तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे घेऊन त्याला आपल्या आवडीनुसार कटलेटचा आकार द्या.
७) तयार कटलेट रव्यामध्ये घोळवून तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करा.
८) गरम गरम कटलेट टोमॅटो साॅस/चटणी बरोबर सर्व्ह करा.
# Vegetable Cutlet
Ingredients:
- 5-6 Potatoes
- 2-3 Red Carrots
- 1/2 cup Green Peas
- 1 medium-sized Beetroot
- 1 medium-sized Onion (optional)
- 1 medium-sized Tomato
- 5-6 slices of Bread for bread crumbs
- 1 tsp Ginger-Garlic-Chili paste (optional)
- 1/2 Cup finely chopped coriander leaves
- 1 tsp Garam Masala
- 1 tsp Coriander powder
- 1/2 tsp Cumin powder
- 1/4 tsp Black Pepper powder
- Salt to taste
- Semolina (Rava) as needed
- Oil as needed
Method:
1) Peel and grate the carrots and beetroot. Grind the onion, ginger, garlic and chili together to make paste.
2) Blend the tomato into a fine paste/puree.
3) Heat oil in a pan and add a paste of onion, ginger, garlic and green chili. Sauté it well. Then add the blended tomato paste and sauté again, followed by adding peas. Stir the peas and cook them well.
4) Add grated carrots and beetroot, and mix them well. Cover the pan with a lid and cook the mixture properly. After that, add coriander powder, garam masala, cumin powder, and black pepper, and mix everything together.
5) Once the carrots and beets are cooked, mash the boiled potatoes and add them to the prepared mixture. Also, add bread crumbs and finely chopped coriander. Add salt to taste and mix everything together. Turn off the gas.
*Use mixer jar to prepare the bread crumbs from slice bread or you can use bread crumbs that are readily available in the market.
6) Once the mixture cools down to a lukewarm temperature, take small portions of the mixture and shape them into cutlets according to your choice.
7) Coat the cutlets with semolina (rava) and shallow fry them on both sides on a griddle with oil. This will give the cutlets a nice crunchy texture on the outside while keeping them soft inside.
8) Serve the hot, freshly made cutlets with tomato sauce or chutney. They taste even better with a tangy sauce! Enjoy your meal!
खूप छान. संध्याकाळच्या Timepass snacks साठी Perfect Snacks. Recipe खूप छान लिहली आहे. खूप खूप शुभेच्छा,
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteमस्तच, टेस्टी. ऑलरेडी tested...😊👍
ReplyDeleteधन्यवाद 🙏🏻
Deleteजगात भारी
ReplyDelete