कैरी भात/ Raw Mango Rice


बहुतेक करून दक्षिण भारतात 'कैरी भात' केला जातो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोकण भागात थोडाफार बदल करून कैरी भात केला जातो. मी कोकणात पर्यटनाला गेले असताना माझी व 'कैरी भाताची' प्रथमच ओळख झाली आणि कैरी भाताशी माझी चांगलीच गट्टी जमली. साधारण मार्च महिन्यापासून बाजारात कैऱ्या मिळू लागतात . त्यावेळी बऱ्याचदा मी कैरी भात करते. आपल्याकडे कैरी घालून लोणची, साखरआंबा, चटणी, सार, असे विविध प्रकार केले जातात. कैरी भात करायला सोपा असून, चवीला पण छानच लागतो व घरातील साहित्यातच तयार होतो. नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. कैरीचा भात करण्यासाठी भात मोकळाच हवा, चिकट किंवा जास्त शिजलेला भात नसावा. कैरी भात करतांना उडीदडाळ, मिरच्या, कडीपत्ता, हळद, हिंग, कांदा घालून खमंग फोडणी करून त्यात तयार भात व कैरी घालावी. उडीदडाळ व तळलेल्या शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा मस्तच लागतो. कैरी भात करतांना त्यात कैरीच्या आंबटपणाची चव लागायला हवी, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कैरीचे व त्यातील तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्ही, अधिक तिखटपणासाठी लाल मिरच्यांबरोबर हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता. मी कैरी भात करतांना, मला आवडतो म्हणून मी कांदा पण घातला आहे. चवीत बदल म्हणून 'कैरी भात' करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहू या कैरी भाताची रेसिपी.   

रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

  साहित्य:
  • २ कप तयार मोकळा भात
  • १ किसलेली कैरी 
  • १ चिरलेला कांदा 
  • २ टीस्पून उडीदडाळ 
  • ४-५ टेस्पून शेंगदाणे 
  • २-३ सुक्या लाल मिरच्या 
  • ८-१० कडिपत्याची पाने 
  • चवीनुसार मीठ 
फोडणीसाठी:
  • २-३ टेस्पून तेल
  • १/२ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून हळद 
  • १/४ टीस्पून जिरं
  • १/४ टीस्पून हिंग 

कृती: 

१) एका कढईत तेल तापवून त्यात शेंगदाणे तळून बाजूला काढून ठेवा. नंतर त्यात मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून फोडणी करा.

२) त्यात सुक्या मिरचीचे तुकडे, कडीपत्ता, उडीद डाळ व चिरलेला कांदा घालून मिश्रण २-३ मिनिटे परता.

३) कांदा चांगला परतून झाला की, त्यात तयार मोकळा भात व चवीनुसार मीठ घालून २-३ मिनिटे परता. तयार भातामध्ये किसलेली कैरी घालून मिश्रण १-२ मिनिटे ढवळा व गॅस बंद करा. 

४) तयार कैरी भात तळलेले शेंगदाणे घालून सर्व्ह करा.

# Raw Mango Rice #



"Raw Mango Rice" is originally a South Indian dish. However, it is also made with a little variation in some parts in Kokan region of Maharashtra. Few years ago I had visited a small town in Dapoli Taluka (Kokan) as a tourist and there, I tasted Raw Mango Rice for the first time. I really love Raw Mango Rice for its tangy taste. In the month of March, Raw Mangoes are available in the market. Variety of dishes are prepared using Raw Mangoes. In this recipe, I have used Onion with Raw Mango because I like the combination. The name "Raw Mango Rice" itself is mouthwatering. All required ingredients are easily available at home. It tastes good because of crunchy Urad dal and fried groundnuts. For Raw Mango Rice, cook the Rice and cool it completely. It should not be overcooked & sticky and it's grains should be separate.  Let's see the simple & easy recipe of Raw Mango Rice.

If you like this recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.

Ingredients:
  • 2 cups Cooked Rice 
  • 1 Raw Mango (grated)
  • 1 medium sized Onion (chopped)
  • 2 tsp Split Black Gram (Urad dal) 
  • 4-5 tbsp Groundnuts
  • 2-3 Red Dry Chilies 
  • 8-10 Curry Leaves
  • Salt as per taste

For Tempering:

  • 2-3 tbsp Oil
  • 1/2 tsp Mustard seeds
  • 1/2 tsp Turmeric Powder
  • 1/4 tsp Cumin 
  • 1/4 tsp Asafoetida 

Method:


1) Heat oil in a pan. Fry Groundnuts in it and keep it aside. 

2) Now add Mustard seeds in the Oil. When it sputters, add Cumin, Turmeric Powder, Asafoetida, Curry Leaves, Urad Dal, pieces of Red Chilies, chopped Onion and sauté it for 2-3 minutes.

3) When Onion turns brown, add cooked Rice and Salt as per taste and mix it well. Add Grated Raw Mango sauté it for 1-2 minutes.

4) Garnish the Raw Mango Rice with fried Groundnuts and serve it.



Comments

Popular Posts