पोह्याचे डांगर/ Pohyache Dangaar


महाराष्ट्रातील कोकण प्रांतात, विशेष करून 'पोह्याचे डांगर' केले जाते. कोकणातील 'पेण' या गावातील पोह्याचे पापड प्रसिद्ध आहेत. खूप मस्त व तिखट असतात. अलीकडे पोह्याचे पापड घरी केले जात नाहीत, म्हणून 'पोह्याचे डांगर' खायला मिळत नाही. पण हल्ली दुकानात पोह्याचे पापड व "पोहा डांगर पीठ" विकत मिळते. आम्ही लहान असतांना आई 'पोह्याचे पापड' घरीच करायची. 'पोह्याचे डांगर' म्हणजे पोह्याच्या पापडाच्या पीठात ताक किंवा दही, तेल व मीठ घालून गोळा तयार करायचा. सहसा सगळे साहित्य घरातच उपलब्ध असते, त्यामुळे घरच्या घरी अगदी कमी वेळात पोह्याचे डांगर तयार होऊ शकते. चला तर पाहू या पोह्याचे डांगर कसे करायचे? 

रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

पोह्याचे डांगर पीठ करण्यासाठी :-
साहित्य:
  • १०० ग्रॅम जाडे पोहे 
  • १/२ टीस्पून पापडखार 
  • २-३ टीस्पून लाल तिखट 
  • १/४ टीस्पून हिंग 

कृती:

१) एका कढईत मध्यम आंचेवर जाडे पोहे ३-४ मिनिटे किंवा थोडे कुरकुरीत होईपर्यंत भाजा (पोहे भाजतांना, पोहे हाताने मोडून बघा. लगेचच मोडले तर पोहे भाजायचे थांबवा). एका भांड्यात पोहे काढा व  गार होऊ द्या.

२) मिक्सरमध्ये भाजलेले पोहे बारीक दळून घ्या व चाळणीने एकदा चाळून घ्या. चाळलेल्या पीठात लाल तिखट, हिंग व पापडखार घालून मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून, मिश्रण एकत्र करा. आता आपले पोह्याचे डांगर पीठ तयार झाले.


* लाल तिखटाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा.

पोह्याचे डांगर करण्यासाठी :-

साहित्य:
  •  टेस्पून पोह्याचे डांगर पीठ (कृती वरीलप्रमाणे)
  • २-३ टीस्पून तेल  
  • १-२ टेस्पून दही किंवा ताक 
  • मीठ चवीनुसार 
  • पाणी (अंदाजे ५० मिली )
कृती:

) एका भांड्यात डांगर पीठ घ्या. त्यात २ टीस्पून तेल, १-२ टेस्पून दही किंवा ताक व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून मऊसर गोळा मळा. गरज वाटली तर थोडे तेल लावून गोळा मळा. 
















) दिलेल्या प्रमाणात ८-९ गोळे होतात. लहान चपटे गोळे तयार करून, त्यावर थोडे तेल घालून 'पोह्याचे डांगर' सर्व्ह करा. 


Pohyache Dangaar #


In Kokan region of Maharashtra, 'Pohyache Dangaar' is a famous spicy side dish. 'Pen' city in Konkan is famous for 'Poha Papad' which are very tasty, crispy and spicy. My mother always used to make Poha Papad at home. Now a days, very few prepare Poha Papad at home. Papad flour is used for preparing  'Pohyache Dangaar'. It is nothing but a dough kneaded by adding Curd, Oil and Salt. Actually, it is very easy to make at home in short time, as all ingredients are mostly available at home. Let's see the recipe.

If you like the recipe, please don't forget to like, comment, share and subscribe my blog.

For Papad flour (Pohyache Dangaar Peeth ) :-


Ingredients:

  • 100 gram Flattened Rice 
  • 1/2 tsp Papadkhar (used for making papads)
  • 2-3 tsp Red Chili powder 
  • 1/4 tsp Asafoetida 

Method:

1) In a pan, dry roast Flattened Rice on medium flame for 3-4 minutes or till it turns crispy. Keep it aside and let it get cool.

2) Grind the roasted Flattened Rice in mixer and make a fine powder. Sieve the flour with strainer. Take the sieved flour in mixer jar, add Red Chili Powder,  Asafoetida & Papadkhar and mix it once again. Our Papad flour (Pohyache Dangaar Peeth) is ready now. Store it in an  airtight container. It will last upto 1 month.




* You can add Red Chili Powder for more spicy taste.


For Pohyache Dangaar :-

Ingredients:
  • 5 tbsp Papad flour (Pohyache Dangaar Peeth )
  • 2-3 tsp Oil  
  • 1-2 tbsp Curd or Buttermilk 
  • Salt as per taste 
  • Water (50 ml approx.)
Method:

1) In a mixing bowl, take 3-4 tbsp Papad flour (Pohyache Dangaar Peeth ), add Curd or Buttermilk, Oil & required amount of Water in it and knead a soft dough. Add some Oil (if needed). 



2) Divide the dough in equal portions. Shape each portion in round shape and flatten them like Pedha. You can prepare 8-9 pieces from it. Serve it with some Oil.

Comments

Popular Posts