चणाडाळ घालून सिमला मिरचीची भाजी / Capsicum with Split Chickpeas
महाराष्ट्रात सिमला मिरचीचा उपयोग मुख्यतः भाजी करण्यासाठी होतो. मंडईत हिरवी, पिवळी, लाल अशा तिन्ही रंगात सिमला मिरची उपलब्ध असते. सॅलडकरिता, सुप्समध्ये, सिझलर्स मध्ये, काँटिनेंटल डिशेशमध्ये अशा रंगीत सिमला मिरचीचा वापर होतो. सिमला मिरची काही ठिकाणी ढोबळी मिरची किंवा ढब्बू मिरची या नावाने ओळखली जाते. टोमॅटो-कांदा कोशिंबीरीमध्ये किसलेली सिमला मिरची घातली तर कोशिंबीरीची चव मस्तच लागते. सिमला मिरचीची भाजी, चिंच-गुळाची, पीठ पेरून किंवा छोट्या सिमला मिरच्या वापरून भरलेली सिमला मिरची, अशा वेगवेगळ्या प्रकारे करतात. मी बऱ्याच वेळा भिजवलेली चणाडाळ घालून सिमला मिरचीची भाजी करते. सिमला मिरची मध्ये विटामिन 'ए' व 'सी' असते तर चणाडाळीमध्ये प्रोटीन असते. अशी ही गुणकारी सिमला मिरची सगळ्यांनी योग्य प्रमाणात खाल्ली पाहिजे. पाहूया "चणाडाळ घालून सिमला मिरचीची भाजी". रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
साहित्य:
- २-३ मध्यम आकाराच्या सिमला मिरच्या
- १/४ कप चणाडाळ
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून साखर
- २ टेबलस्पून तेल
- १/४ टीस्पून मोहरी
- १/८ टीस्पून हळद
- चिमुटभर हिंग
- मीठ चवीनुसार
१) एका भांड्यात चणाडाळ धुवून २ तास भिजवून ठेवा. चणाडाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून, मिक्सरमध्ये भरड वाटून घ्या. वाटलेली डाळ एका भांड्यात काढून ठेवा. सिमला मिरचीतील बिया काढून सिमला मिरची मध्यम आकारात चिरून घ्या.
२ ) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. वाटलेली चणाडाळ घालून मिश्रण १-२ मिनिटे परतून घ्या. लगेचच चिरलेली सिमला मिरची, साखर व चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळून घ्या. भाजीवर पाण्याचा एक हबका मारुन भाजीवर २-३ मिनिटे झाकण ठेवा.
३) झाकण काढून भाजी ढवळा. मध्यम आचेवर चणाडाळ व मिरची शिजू द्या. आवश्यकता वाटल्यास पुन्हा पाण्याचा हबका मारून भाजी शिजवा.
४) तयार भाजी पोळी बरोबर सर्व्ह करा.
# Capsicum with Split Chickpeas #
Capsicum is one of my favorite vegetable. In our markets, it is available in three colours viz. Green, Red and Yellow. These are used in preparing Soups, Salads and varieties of Rice. These dishes look attractive because of their colours. Apart from this, Capsicum has a lot of nutritional values. It contains Vitamin 'A' and 'C'. In Maharashtra, generally, Green Capsicum is used for making Subji. Capsicum and Split Chickpeas is a good combination of Subji. Normally Split Chickpeas flour (Besan) is used along with Capsicum. But I prefer to use soaked Split Chickpeas. Thus "Capsicum with Split Chickpeas" becomes Protein & Vitamin rich dish. So let's see how to make this subji. If you like the recipe, please do like, comment, share and subscribe.
Ingredients:
- 2-3 medium sized Capsicum
- 1/4 cup Split Chickpeas
- 1/2 tsp Red chili Powder
- 1 tsp Sugar
- 2 tbsp Oil
- 1/4 tsp Mustard seeds
- 1/8 tsp Turmeric Powder
- A pinch of Asafoetida
- Salt as per taste
Method:
1) Soak Split Chickpeas (Chanadal) for 2 hours. Drain the water from it and grind it coarsely in mixer and keep it aside. Remove the seeds and chop the Capsicum into medium sized pieces.
2) Heat Oil in a pan. When it gets hot, add Mustard seeds. When it sputters, add Turmeric powder, Red Chill powder and Asafoetida in it. Add coarsely ground Split Chickpeas in it & mix it well. Add Chopped Capsicum, Sugar and Salt as per your taste. Mix it well. Sprinkle some water on the mixture and cover it with a lid for 2-3 minutes.
3) Remove the lid, stir the mixture. If required, again sprinkle some water on it and cook it for 2-3 minutes or until cooked.
4) Serve it with Chapati and enjoy it.
Comments
Post a Comment