मसाला भेंडी/Masala Bhendi


भेंडीची भाजी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूपच आवडते. माझ्यासाठी भेंडीची भाजी म्हणजे एक हुकमी एक्का आहे. माझ्याकडे  कोणत्याही प्रकारे केलेली भेंडीची भाजी सगळ्यांना आवडते. चुरचुरीत भेंडी, कुरकुरीत भेंडी, ताकातली भेंडी, चिंच-गुळाची भेंडी, भरली भेंडी असे नाना-विविध प्रकारे भेंडीची भाजी केली जाते. थोडा फार बदल करून केलेली 'मसाला भेंडी' हा त्यातीलच एक नवा, चविष्ट व स्वादिष्ट प्रकार आहे.
मसाला भेंडी करतांना शक्यतो लहान व हिरवीगार कोवळी भेंडी घ्यावी. भेंडीचे देठ व टोक काढून, मध्यम आकाराचे तुकडे करावेत. 'मसाला मिक्स' तयार करून, भेंडी व मसाला मिक्स तेलावर परतून मसाला भेंडी करावी. घरातील उपलब्ध साहित्यामध्ये पटकन तयार होणारी ही पाककृती आहे. पाहू या मसाला भेंडी ची पाककृती.

साहित्य :
  • २५० ग्राम भेंडी
  • १/२ कप  खोवलेला  ओला नारळ
  • १ मोठा बारीक चिरलेला कांदा
  • १/४ कप  बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ टीस्पून लाल तिखट
  • २ टेस्पून शेंगदाण्याचे कुट
  • २ टीस्पून गोडा मसाला
  • १ टेस्पून लिंबाचा रस
  • १ टीस्पून साखर
  • चवीनुसार मीठ 
  • २ टेस्पून तेल
  • १/४ टीस्पून मोहरी 
  • १/४ टीस्पून हळद
  • चिमूटभर हिंग 
    कृती:

    १) भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. भेंडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

    २) मसाला मिक्ससाठी:- एका भांड्यात खोवलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कांदा, गोडा मसाला, लाल तिखट, मीठ, लिंबूरस, साखर, शेंगदाण्याचे कुट एकत्र करा.




    ३) कढईत तेल तापवा. तेल तापले की, त्यात थोडी मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट घाला व भेंडीचे तुकडे घाला. ३-४ मिनिटे परता. त्यात एकत्र केलेला मसाला घाला. ३-४ मिनिटे झाकण ठेवा.

    ४) भाजी हलक्या हाताने ढवळा. भेंडी शिजू द्या. मसाला चांगला परता. ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.

    ५) गरम गरम पोळी बरोबर सर्व्ह करा.

    *तुमच्या आवडीप्रमाणे तिखट-मीठाचे प्रमाण वाढवा.

    Masala Okra (Bhendi) #

    Any dish prepared with Okra is liked by all age groups. Even at my home, everybody likes the same. Okra is like a "Trump Card" for me. We can prepare N number of dishes with Okra.  For example, Crunchy Okra, Okra with Buttermilk, Okra with Tamarind & Jaggery, Okra with Grated coconut & Onion and Okra Fry etc. "Masala Okra" is one of such varieties. I prepare this dish with Okra and my different version of 'Masala Mix', which is very tasty and delicious. Use fresh Okra which is small in size. This can be prepared with the ingredients readily available at home. Let's see how to prepare "Masala Bhendi " or "Masala Okra".

    Ingredients :


    • 250 gms Okra (Bhendi)
    • ½ cup grated Coconut
    • 1 large Onion ( finely chopped )
    • ¼ cup finely chopped Coriander leaves
    • 2 tsp Red Chili powder
    • 2 tbsp Groundnut powder
    • 2 tsp Goda Masala
    • 1 tbsp Lemon juice
    • 1 tsp Sugar
    • Salt as per taste
    • 2 tbsp Oil
    • ¼ tsp Mustard seeds
    • ¼  tsp Turmeric powder
    • A pinch of Asafoetida

    Method:

    1) Wash Okra in water, dry it and cut them into medium-sized pieces.

    2) For Masala Mix :- In a bowl, combine grated Coconut, chopped Coriander leaves, chopped onion, Goda Masala, Red Chili powder, Lime juice, Sugar, Groundnut powder and Salt as per taste. Mix it well and keep it aside.



    3) Heat oil in a pan. Once it gets hot, add Mustard seeds. When it sputters, add Asafoetida, Turmeric powder and Okra pieces. Sauté  it for 3-4 minutes. Add the Masala Mix in the pan. Cover it with a lid and cook it for 3-4 minutes.

    4) Gently stir the subji and sauté the masala well. Cook it on a low flame for 5-7 minutes or until it gets cooked.

    5) Serve it hot with Chapati. 

    *Add Salt and Spices according to your taste.

    Comments

    Post a Comment

    Popular Posts