भाजणीचं थालीपीठ/ Bhajani Thalipeeth


थालीपीठ करण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यात भाजणीचं थालीपीठ म्हटलं की, अहाहा!!! त्याचा सुगंध, त्यावरती कणीदार तूप, कैरीचं ताजं लोणचं आणि अधमोरं दही.... आणखीन काय हवं मग? थालीपीठाचा सुगंध अगदी घरभर दरवळतो आणि असे गरमगरम थालीपीठ आपण कधी एकदा खातोय असं होतं. अगदी एका थालीपीठामध्ये देखील पोट भरतं. थालीपीठ करण्यासाठी भाजणी घरात असायला हवी. हल्ली तर थालीपीठ भाजणी बाजारात सहज उपलब्ध होते. घरात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ असल्याने मी एकदाच २-३ किलोची भाजणी करून ठेवते. १ वाटी भाजणी मध्ये १ थालीपीठ होते. भाजणी करतांना, तांदुळ, ज्वारी, बाजरी, अख्खे उडिद, मूग, मटकी, हरभरे, मेथीदाणे, धने-जिरं प्रमाणात घेऊन व भाजून भाजणी दळून आणावी. अशी भाजणी २-३ महिने सहज टिकते. घरच्या भाजणीची चवच न्यारी असते.

भाजणी पासून आपण भाजणीचे थालीपीठ, वडे तर करू शकतोच; पण यापासून भाजणीचे घावनसुद्धा  करू शकतो. कोथिंबीर वडी करताना चणाडाळीच्या पीठाऐवजी (बेसन) भाजणी वापरली तर कोथिंबीर वडी अगदी खुसखुशीत होते.

माझी आई व आजी थालीपीठ करतांना त्यात थोडासा वरणाचा गोळा घालायची. वरण घातल्याने थालीपीठ॔ खुसखुशीत होतात पण वरण जास्त झाले तर मात्र थालीपीठ मोडू शकते. माझ्या आजीला, तव्यापेक्षा पातेल्यात लावलेले थालीपीठ जास्त आवडायचे. बाबांना थालीपीठाशी गुळ खायला आवडत असे. थालीपीठामध्ये कांद्या- ऐवजी चिरलेला कोबी किंवा चिरलेली हिरवी मेथी घालू शकतो.

माझ्या सासूबाई पळसाच्या पानावर थालीपीठ लावतात व थालीपीठ पानसकट तव्यावर टाकून त्यावर झाकण ठेवतात. थालीपीठ होत आले की, वरील पान काढून थालीपीठ उलटतात व दुसरी बाजू शेकतात. पण हल्ली पळसाची पानं शहरात सहज मिळत नाहीत. पळसाचे पान किंवा केळीचे पान मिळाले तर ते वापरावे नाहीतर बटर पेपर वापरावा.

'थालीपीठ' हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक प्रकार आहे. बऱ्याच अस्सल मराठी उपाहारगृहात सुद्धा थालीपीठ व दही मिळते. थालीपीठाबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच. थालीपीठ पुराण काही संपणार नाही. प्रथम थालीपीठ भाजणीची कृती पाहूया. मग असे खमंग, स्वादिष्ट, पौष्टिक व खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते पाहूया. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. 


थालीपीठ भाजणी :-

साहित्य:
५०० ग्राम ज्वारी, ५०० ग्राम बाजरी, २५० ग्राम तांदुळ, २५० ग्राम हरभरे, १२५ ग्राम हिरवे मुग, उडीद  १/२ वाटी, मटकी १/२ वाटी, मसुर १/२ वाटी, गहु १/२ वाटी, १२५ ग्राम धने, १ टी .स्पून मेथीदाणे, १ टी .स्पून जिरं .

कृती:
१) वरील सगळी धान्ये वेगवेगळी भाजुन घ्यावीत.
२) ती एकत्र करून गिरणीतुन दळून आणावी. आपली भाजणी तयार. ती भाजणी एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.

भाजणीचं थालीपीठ :-

साहित्य: 
  • ३ वाट्या थालीपीठ भाजणी 
  • १ मोठा कांदा मध्यम चिरलेला
  • १/४ वाटी चिरलेली कोथिंबीर 
  • १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून किंवा १-२ टीस्पून लाल तिखट 
  • १ टीस्पून ओवा 
  • १/२ टीस्पून हळद 
  • १/४ टीस्पून हिंग
  • मीठ चवीनुसार 
  • तेल आवश्यकतेनुसार 

कृती:

१) एका भांड्यात थालीपीठ भाजणी, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, चिरलेल्या हिरव्या मिरच्या (किंवा लाल तिखट), ओवा, हळद, हिंग व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा व भाकरीच्या पिठाप्रमाणे भिजवा.
मिश्रणाचे समान भाग करून गोळे करून घ्या.



२) एका बटर पेपरवर थोडं तेल लावा. त्यावर एक गोळा घेऊन गोलाकार थापा व मध्यभागी ४-५ भोकं पाडा. तवा मध्यम आंचेवर तापत ठेवा. थापलेले थालीपीठ बटर पेपरसकट उचलून, तव्यावर उलटं टाकून,बटर पेपर काढून घ्या. थालीपीठाच्या कडेने १-२ चमचे तेल सोडा व त्यावर झाकण ठेवा. ३-४ मिनिटांनी चुरचुर आवाज आला की, झाकण काढून थालीपीठ उलटा व पुन्हा थालीपीठाच्या कडेने थोडे  तेल सोडून थालीपीठाच्या दोन्ही बाजू सोनेरी रंगावर शेकून घ्या. आपलं थालीपीठ तयार. अश्या प्रकारे उरलेल्या मिश्रणाची थालिपीठं करून घ्या. 







३) गरम-गरम थालीपीठ साजूक तुप, कैरीचे लोणचे व गोड दही किंवा लोण्याबरोबर सर्व्ह करा.


Bhajani Thalipeeth




Thalipeeth is one of the traditional & popular dishes from Maharashtra. There are various types of Thalipeeth. One of the types is "Bhajani Thalipeeth". It is a delicious and yummy multigrain pancake or flatbread prepared for Breakfast in Maharashtra. It is very easy to prepare & is nutritious, healthy, crispy and tasty. It can be prepared in a very short span of time. For preparing, we need 'Thalipeeth flour' called 'Bhajani'. It is a mixed flour prepared with different types of grains and legumes. Rice, Sorghum, Millet, Black gram, Wheat, Whole Black Gram (Chana), Coriander seeds, Fenugreek seeds and Cumin duly roasted & grinded in flour mill. One can prepare Bhajani at home and store it for 3-4 months. Alternatively, now a days, readymade Bhajani is available in market also. One Thalipeeth is generally enough for one's breakfast at a time. 50-60 grams Bhajani is sufficient to make 1 unit of Thalipeeth . My mother & grandmother used to use a spoonful of leftover dal while making Thalipeeth, which gives crispy texture to it. Also, we can use chopped Fenugreek leaves or chopped Cabbage in place of Onion. While making Thalipeeth, use butter paper to flatten it. Normally Thalipeeth is served with butter or Ghee, Mango pickle & Curd.
Recipe of Thalipeeth alongwith Thalipeeth Bhajani is given below. If you like this recipe, don't forget to like, comment, share and subscribe my blog.

For Thalipeeth Bhajani :- 

Ingredients:
500gm Sorghum, 500gm Millet, 250 gm Rice, 250 gm Black Gram (Black Chana), 125 gm Moong Bean1/2 bowl Whole Black Gram, 1/2 bowl Moth Bean, 1/2 bowl Lentil (Whole Masoor), 1/2 bowl Wheat, 125 gm Coriander seeds, 1 tsp Fenugreek seeds and 1 tsp Cumin

Method:
1)Roast all the grains separately. 
2)Mix it and grind them all in a flour mill. Our Bhajani is ready. Store it in a airtight container.

For making Thalipeeth :- 


Ingredients:
  • 3 bowl Thalipeeth Bhajani 
  • 1 large Onion (chopped)
  • Handful of chopped Coriander leaves
  • 1-2 Green Chilies (chopped) / 1-2 tsp Red Chili powder
  • 1 tsp Ajwain (Carom seeds) 
  • 1/2 tsp Turmeric powder 
  • 1/4 tsp Asafoetida
  • Salt as per taste
  • Oil (as per need) 
Method:

1) In a large mixing bowl, combine Thalipeeth Flour (Bhajani), chopped Onion, chopped Coriander leaves, chopped Green Chilies ( or Red Chili powder ), Ajwain (Carom seeds), 
Turmeric powder, Asafoetida and Salt as per taste. Knead a firm dough with required amount of water. Divide the dough in equal portions.




2) Heat an griddle or tawa ( preferably of iron ) on medium heat. Take a butter paper and apply Oil on it. Take one portion of the dough and flatten it equally on butter paper in a circular shape. Make a hole in the center and 3-4 around it, which helps it to become crispy. Place it gently on a griddle or tawa and then remove the butter paper with due care; otherwise Thalipeeth would break. Smear some oil on the Thalipeeth and cover it with a lid. Cook it for 2-3 minutes and then remove the lid to flip it. Then, again smear some Oil on it and cook it for 2-3 minutes till it turns golden brown.



3) Serve hot with Butter or Ghee, Mango pickle and Curd.


Comments

Popular Posts