कैरीचे सार/ Kairiche saar
महाराष्ट्रात चैत्र महिना सुरु झाला की, बहुतेक मंडईत कै-या मिळू लागतात आणि घराघरात कैरीचे विविध प्रकार केले जातात. कैरी पासून कैरी भात, आंबेडाळ, कैरी चे पन्हे, कैरीचा छुंदा, टक्कू, लोणचं व केले जाते. महाराष्ट्रातील कोकण प्रांतात हमखास केला जाणारा "कैरीचे सार" हा असाच एक पदार्थ आहे. भाताबरोबर प्रामुख्याने आमटी ऐवजी हे सार आवर्जून केले जाते. कैरीचे सार करण्याची प्रत्येकाची पध्दत वेगळी असते. कैरीच्या सारा मध्ये काही ठिकाणी नारळाचे दूध वापरतात, तसेच गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर होतो.आंबट गोड असे कैरीचे सार घरातील सगळ्या वयोगटातील व्यक्तींना नक्कीच आवडते. पाहूया कैरीच्या साराची पाककृती. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.
साहित्य:
- १ मध्यम कैरी
- १/४ चमचा मेथीदाणे
- १/४ टीस्पून मोहरी
- १/४ टीस्पून जिरं
- १-२ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे
- १/८ टीस्पून हळद
- चिमुटभर हिंग
- १ टेबलस्पून चणाडाळीचे पीठ
- १ टेबलस्पून तेल
- आवश्यकतेनुसार गुळ
- १/४ लाल तिखट
- चवीनुसार मीठ
१) कैरी उकडून त्याचे सालं काढून कैरीचा गर काढून घ्या. (मिक्सरमध्ये फिरवून घेतले तरी चालेल.)
२) एका पातेल्यात कैरीचा गर काढून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण उकळवा.
३) चणाडाळीच्या पीठात थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून कैरीच्या गरात घालून मिश्रण ढवळा. कैरीचा आंबटपणा पाहून गुळ घाला. चवीनुसार मीठ घालून सार उकळवा.
४) एका छोट्या कढईत तेल तापवून त्यात मेथी दाणे, मोहरी, जिरं, हिंग, हळद, सुक्या मिरच्यांचे तुकडे, कडिपत्ता व लाल तिखट घालुन फोडणी करून कैरीच्या मिश्रणात घाला.
५) कैरीचे गरमागरम सार भाताबरोबर सर्व्ह करा.
# Kairiche Saar/ Raw Mango Curry #
Ingredients :
- 1 medium sized Raw Mango (kairi)
- 1/4 tsp Fenugreek seeds
- 1/4 tsp Musturd seeds
- 1/4 tsp Cumin seeds
- 1-2 Dry Red chilies
- 5-6 Curry Leaves
- 1/8 tsp Turmeric powder
- A pinch of Asafoetida
- 1 tbsp Besan
- 1 tbsp Oil
- Jaggery as required
- 1/4 tsp Red Chili Powder
- Salt as per taste
Method:
1) Pressure cook Raw Mango (kairi) in a cooker, peel it & separate pulp from it. (Make a smooth paste of pulp in the mixer).
2) Pour the Raw Mango Pulp (Kairi Pulp) in a vessel. Add some water to adjust the consistency and boil it.
3) Add a liittle water into Besan, make a smooth paste, add it to the mixture and stir it well to avoid lumps.
4) Add Jaggery & Salt as per taste (Taste the sourness of Raw Mango then add Jaggery according to it's sourness).
5) Heat Oil in a pan, add Fenugreek seeds, Mustard seeds, Cumin seeds, Asafoetida, Turmeric powder, Red Chili pieces, Curry leaves & Red Chili powder. Pour the tempering (tadka) over the Mango curry.
6) Serve it hot with steam rice.
Comments
Post a Comment