वांग्याची भजी / Eggplant Fritters



"भजी" हा प्रकार पूर्ण भारतात केला जातो. अगदी मोठ्या रेस्टॉरंट पासून ते खाऊ गल्लीमधील हातगाडीवर हा पदार्थ सर्वजण आवडीने खातात. कांदा, बटाटा, पनीर, कोबी, पालक, मेथी, ओव्याची पानं वापरून विविध प्रकारची भजी केली जातात.  ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये आम्ही सिक्किमला गेलो होतो. त्यावेळी संध्याकाळी चहाबरोबर "वांग्याची भजी" खाण्याचा योग आला. या प्रकारची भजी आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडली. आज अगदी तशीच्या तशी नाही पण त्यासारखी भजी करून पाहिली 
व बऱ्यापैकी जमली. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मोजक्या साहित्यात व पटकन तयार होणारा असा हा स्वादिष्ट पदार्थ आहे. पाहूया "वांग्याची भजी"  करायची पाककृती.

रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.

साहित्य:

  • १ मोठं वांगं 
  • ५-६ टेबलस्पून चणाडाळीचे पीठ
  • १ टीस्पून लाल तिखट
  • १/४ टीस्पून हळद
  • १ टीस्पून चाट मसाला
  • १ टीस्पून गरम मसाला
  • १ टीस्पून कलौंजी* किंवा ओवा
  • १/४ टीस्पून हिंग
  • मीठ चवीनुसार
  • चिमुटभर सोडा
  • तळण्यासाठी तेल
कृती:

१) प्रथम वांगं स्वच्छ धुवून घ्या. वांग्याचे देठ काढून वांग्याला उभी चिर द्या. वांग्याचे अर्धगोलाकार व मध्यम जाडीचे काप करून घ्या. चिरलेले वांग्याचे  काप व थोडंस मीठ एकत्र करून पाण्यात ठेवा.




२) चणाडाळीच्या पीठात लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला ,कलौंजी किंवा ओवा, हळद, हिंग व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार पाणी व चिमुटभर सोडा घालून भजीच्या पीठाला भिजवतो तसे पीठ भिजवून घ्या. पीठ भिजवतांना थोडे थोडे पाणी घाला व गुठळी होणार नाही याची काळजी घ्या.



३) एका कढईत तेल तापवून घ्या. चणाडाळीच्या पीठात एकेक काप बुडवून तेलात सोडा. मध्यम आंचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भजी तळून घ्या व झा-याने काढून टिश्यू पेपर वर ठेवा. 

४) गरमगरम "वांग्याची भजी"; लसुण चटणी, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

कलौंजीच्या ऐवजी तुम्ही काळे तीळ किंवा ओवा वापरू शकता.

# Eggplant Fritters #



Various types of Fritters are served in different parts of India. Foodies love to eat Fritters anywhere, may it be a big Restaurant or a Handcart on a roadside. It is served as an evening snacks with tea in Restaurants. Usually, Onion, Potato, Paneer, Methi, Palak, Cabbage, etc. are used for preparing Fritters. I had "Eggplant Fritters" for the first time in Sikkim as an evening snacks with tea and I loved it very much. So I have decided to prepare Eggplant Fritters in similar way at home. Eggplant is popularly known as "Brinjal". It's a very easy to make recipe and is prepared in a short period of time.  All ingredients for preparing this recipe are generally available at home. 
So let's see the simple & delicious recipe of "Eggplant Fritter".

If you like the recipe don't forget to like, Share, Comment and Subscribe my blog.


Ingredients:
  • 1 large Eggplant (Brinjal)
  • 5-6 tbsp Gram Flour( Besan)
  • 1 tsp Red Chili powder
  • 1 tsp Chat Masala
  • 1 tsp Garam Masala
  • 1 tsp Kalonji* (Nigella seeds) or Ajwain
  • 1/4 tsp Turmeric powder
  • 1/4 tsp Asafoetida
  • A pinch of Baking Soda
  • Oil for frying


Method :

1) Wash the Eggplant and cut it vertically. Cut them into semicircle slices. Keep the Eggplant slices in water and add some salt in it. 



2) In a large mixing bowl; add Gram Flour (Besan), Red Chili powder, Chat masala, Garam masala, Kallonji (Nigella seeds) / Ajwain, Turmeric powder, Asafoetida and a pinch of Baking Soda. Mix it well and add little water in it to form a smooth and lump free batter. It should be of spoon-drop or coating consistency. 



3) Heat Oil in a pan or wok for frying. Now, take a slice of Eggplant, coat it in the batter and slowly drop the coated Eggplant slice in the hot Oil. Deep fry the Eggplant slice on a medium flame till it turns golden brown from both the sides . Add a batch of 3-4 Eggplant slices at a time. Remove it with slotted spoon on a tissue paper & keep it aside. Now, deep fry all the remaining slices in the oil.

4) Serve hot "Eggplant Fritters" with Garlic Chutney/ Green Chutney or Tomato Sauce .

*You can also use Black Sesame Seeds or Ajwain (Carom Seeds) instead of Nigella Seeds (Kalonji).

Comments

Post a Comment

Popular Posts