Rajma - Rice / Red kidney Beans curry with Rice / राजमा व राईस
"रोज काय भाजी करावी?" हा प्रश्न सामान्य गृहिणीला रोजच पडतो. कधी फळभाजी, हिरवी पालेभाजी, शेंगभाजी तर कधी वेगवेगळी कडधान्ये वापरून रोजच्या स्वयंपाकात विविधता आणण्याचा प्रयत्न प्रत्येक गृहिणी करतच असते. आज मी "राजमा-राईस" करण्याचे ठरवले आहे.
उत्तर भारतात विशेष करून, आहारामध्ये राजमा वापरला जातो. "राजमा-राईस" हा एक प्रसिद्ध भारतीय शाकाहारी पदार्थ आहे. काही मसाले व उकडलेला राजमा वापरून दाटसर ग्रेव्ही करून, राजमा मसाला करतात. बहुतेक वेळा मेक्सिकन डिशेशमध्ये राजमा वापरला जातो. राजमा खाण्यासाठी पौष्टीक असून, त्यात मिनरल, आयर्न, कॅल्शिअम, व्हिटॅमिन व प्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुण असतात असे माझ्या वाचनात आले आहे.
माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेल्या पद्धतीने मी "राजमा-राईस" नेहमी करते. बाजारात २-३ प्रकारचा राजमा मिळतो पण मी लाल रंगाचा राजमा वापरते. "राजमा मसाला" करतांना मी त्यात थोडे काजू, बदाम, कांदा, टोमॅटो व काही मसाले वापरून ग्रेव्ही करते. माझ्याकडे "राजमा मसाला" केला की, त्याबरोबर राईस हवाच.
रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मराठी व इंग्रजीतील रेसिपिकरीता दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पाहूया "राजमा-राईस" ची पाककृती.
साहित्य :
- १ कप राजमा
- ८-१० काजू
- ६-७ बदाम
- २ मोठे कांदे उभे चिरलेले
- २-३ मध्यम आकाराचे टोमॅटो
- ६-७ लसूण पाकळ्या
- १" आलं
- १/२ टीस्पून जिरं पावडर
- १ टीस्पून धने पावडर
- १/२ टीस्पून आमचूर
- १ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
- २ टीस्पून *राजमा मसाला पावडर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
कृती :
१) राजमा स्वछ धुवून रात्रभर किंवा ८-१० तास भिजवा. राजमा धुवून त्यात १ कप पाणी, थोडे मीठ व चिमूटभर सोडा घालून, कुकरमध्ये ३-४ शिट्या करून शिजवून घ्या.
२ ) एका कढईत थोड्या तेलावर उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घ्या. त्यातच आलं, लसूण घाला.
टोमॅटोच्या फोडी करून टोमॅटोपण कांद्याबरोबर परतून घ्या. हे मिश्रण गार होण्यासाठी एका भांड्यात काढून ठेवा.
३) गार झाल्यावर वरील मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
४) काजू, बदाम, जिरं पावडर, धने पावडर, आमचूर, लाल तिखट, काश्मिरी लाल मिरची पावडर, राजमा मसाला पावडर एकत्र करून मिक्सर मध्ये फिरवून कोरडा मसाला वाटून घ्या .
५) एका कढईत तेल तापवून, त्यात वाटलेला कांद्याचा मसाला ३-४ मिनिटे परतून घ्या. त्यात कोरडा मसाला घालून २-३ मिनिटे परता. त्यात उकडलेला राजमा,चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून एक उकळी येऊ द्या. मिश्रण दाटसर झाले की, गॅस बंद करा. गरम-गरम "राजमा-राईस" सर्व्ह करा.
# Rajma - Rice / Red kidney Beans curry with Rice #
"What to prepare for daily meal" is a great challenge for every housewife. However, they make variety of innovative dishes with the use of leafy vegetables, legumes and cereals for the family. Today I have decided to make “Rajma-Rice”.
“Rajma-Rice” is a popular vegetarian Indian dish from North India, consisting of Rajma in thick gravy with Indian spices and served with Rice. Rajma & Rice is a great combination. It is also used in various Mexican dishes. I have read that Rajma is highly nutritious and contains minerals, iron, calcium, vitamins and it helps to increase our immunity. It keeps us healthy.
I always make “Rajma-Rice” in the manner it was suggested by one of my friends. There are 2-3 types of Rajma available in the market, but I use Red Rajma. While making "Rajma Masala", I make its gravy using Cashew nuts, Almonds, Onions, Tomatoes and some Spices.
If you like the recipe, be sure to like, comment, share and subscribe.
Ingredients :
- 1 cup of Kidney Beans (Rajma)
- 8-10 Cashew nuts
- 6-7 Almonds
- 2 large sized Onions (chopped vertically)
- 2-3 medium sized Tomatoes
- 6-7 Garlic Cloves
- 1 "Ginger
- 1 tsp Cumin powder
- 1 tsp Coriander powder
- 1/2 tsp Amchoor
- 1 tsp Red Chili powder
- 1 tsp kashmiri mirch powder
- 2 tsp Rajma Masala Powder
- Salt to taste
- 3-4 tbsp Oil
*Rajma Masala Powder ( it is available in the market or one may use 1tsp Garam Masala)
Method:
1) Rinse & soak the kidney beans overnight or for 8-10 hours. Drain the water and rinse them well. Now add 1 cup water, Salt and a pinch of soda and boil the beans in the cooker. Cook them in the cooker until they become soft.( 3-4 whistles on medium flame).
2) Heat 1 tbsp oil in a pan. Add chopped Onion, saute till it turns brown and then add Ginger and Garlic cloves in it. Add Tomato pieces in it and saute for 1-2 minutes. Remove the mixture in a bowl.
3) Once the mixture gets cool, grind it in mixer to make a smooth paste and then keep it aside.
4) Combine Cashew nuts, Almonds, Cumin powder, Coriander powder, Amchoor, Red Chili powder, Kashmiri lal Mirch powder & Rajma Masala powder and grind the same in a mixer to make dry masala.
5) Heat 2-3 tbsp oil in a pan and saute ground masala for 3-4 minutes. Add dry masala and saute for 2-3 minutes. Add boiled kidney beans, salt as per taste and water to adjust the consistency accordingly and let it boil. When it becomes thick, turn off the gas. Serve hot delicious "Rajma-Rice".
रेसिपी बघूनच करायचा मोह होतोय. मस्त टेम्पटिंग. 👌👌😋
ReplyDelete