आंबोळी /Aamboli




कोकण प्रांतात प्रामुख्याने सकाळी नाश्त्यासाठी आंबोळी व नारळाची चटणी केली जाते. आंबोळी मऊ, लुसलुशित असून पोटभरीचा पदार्थ आहे. मांसाहारी लोक आंबोळी चिकन बरोबर आवडीने खातात. कोलम किंवा जाडे तांदूळ, उडीद डाळ, चणाडाळ, जाडे पोहे व मेथी दाणे एकत्र भिजवून व नंतर वाटून आंबोळी केली जाते. यामध्ये तांदूळ व उडीद डाळ असल्याने कार्बोहायड्रेट्स व प्रोटीन आहे. तसेच पीठ आंबवल्याने आपल्याला यातून व्हिटॅमिन बी व सी सुद्धा  काही प्रमाणात मिळते, असे माझ्या वाचनात आले आहे. आंबोळी करण्यासाठी लागणारे साहित्य घरात सहज उपलब्ध होऊ शकते. अतिशय साधी व सोपी अशी ही पाककृती पाहूया. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. 

साहित्य:
  • ४ वाट्या जाडे तांदूळ 
  • २ वाट्या उडीद डाळ
  • १/४ वाटी चणाडाळ 
  • १ वाटी जाडे पोहे 
  • १/२ टीस्पून मेथीदाणे  
  • मीठ चवीनुसार 
  • तेल आवश्यकतेनुसार 
कृती:

१) जाडे तांदूळ, उडीद डाळ, चणाडाळ व मेथीदाणे स्वच्छ धुवून रात्रभर किंवा ८-१० तास भिजत ठेवा.



२) ८-१० तासांनी पुन्हा एकदा सगळे  मिश्रण धुवून घ्या व जाडे पोहेसुद्धा धुवून घ्या. मिश्रण वाटतांना धुतलेले जाडे पोहे व थोडे पाणी घालून आंबोळीचे पीठ बारीक वाटा. पीठ पळीने पडेल असे घट्टसर असावे . आंबोळीचे पीठ आंबवण्यासाठी  ८-१० तास एका मोठ्या पातेलीत उबदार ठिकाणी ठेवा.







३) ८-१० तासानंतर आंबोळीचे पीठ फुगून वर आले की, ढवळा व त्यात चवीनुसार मीठ घाला आणि मिश्रण एकसारखे करा.

४) काईल किंवा नॉन-स्टिकचा (डोश्याचा) तवा तापवून त्यावर थोडेसे तेल लावून आंबोळीचे डावभर मिश्रण घाला व पळीने गोलाकार पसरवा. आंबोळी थोडी जाडसरच ठेवा व १-२ मिनिटे शेका. थोडे तेल सोडून आंबोळी उलटवा व १-२ मिनिटे पुन्हा शेका.







५) गरम गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करा . 

*आवडीनुसार लहान मुलांसाठी तुम्हाला मिनी आंबोळीसुद्धा करता येतील.  





# Aamboli #



Aamboli is a famous dish, originally from Kokan region of Maharashtra. Generally, it is prepared for Breakfast and served with Coconut chutney. Mostly, non-vegetarian people eat Aamboli with Chicken curry. Main ingredients are Rice, Black gram, Split Chickpeas (Chanadal), Flattened Rice and Fenugreek seeds. It is high in carbohydrates and proteins. I have read it somewhere that fermentation process increases source of vitamin B and C. Normally, all the ingredients are easily available at home and that is why it is easy to prepare. Let's see the recipe of Amboli. If you like this recipe, don't forget to like, comment, share and subscribe my blog.

Ingredients:
  • 4 bowl Rice 
  • bowl Black Gram  
  • 1/4 bowl Split Chickpeas (Chanadal)
  • 1 bowl Flattened Rice 
  • 1 tsp Fenugreek seeds
  • Salt as per taste
  • Oil as required
Method:

1) Wash & soak Rice, Black Gram, Split Chickpeas (Chanadal) & Fenugreek seeds in sufficient water overnight or for 8-10 hours.



2) Wash Flattened Rice and soaked mixture once again and grind the it together in a mixer. Add sufficient water to make a smooth and fine paste. Batter should be of spoon-drop consistency, like Idli batter.  Keep the ground batter in a large vessel for 8-10 hours for fermentation, in warm place. Keep enough space in a vessel for batter to rise.





3) When mixture gets fermented, add Salt as per taste and mix it well. Now batter is ready for Aamboli.


4) Heat a Non-stick tava or Cast Iron Skillet on medium flame and apply oil on it. Pour ladle full mixture on tava and spread it uniformly in circular shape. Aamboli should be thick. Pour some oil on it, cook it for 1-2 minute and cook the other side for 1-2 minute.





5) Serve delicious Aamboli with Coconut Chutney. 

* Serving suggestion for kids: You can make mini Aamboli as shown below.


Comments

Post a Comment

Popular Posts