वांगी-बटाटा भाजी (चिंच व गुळाची)/Brinjal -Potato Curry (with Jaggery and Tamrind)
भरली वांगी महाराष्ट्रात घरोघरी केला जाणारा व आवडणारा पदार्थ आहे. भरली वांगी व भाकरी आणि त्याबरोबर मिरचीचा ठेचा व कांदा म्हणजे अगदी फक्कड गावरान बेत. ज्वारी, बाजरी किंवा तांदुळाची कोणतीही भाकरी व भरली वांगी मस्त लागतात. बच्चे कंपनी तर वांगी खात नाहीत म्हणून भरली वांगी करतांना मला त्यात बटाटा घालावा लागतो. पण त्यांना भाजीची ग्रेव्ही आवडते. गोडा मसाला व गूळ तर मी भाजीत नेहमीच घालते पण आज मी चिंच व गूळ घालून भाजी केली आहे, तसेच वांगी व बटाट्याचे उभे काप तळून भाजीत घातले आहेत. सगळे साहित्य तर घरात असतेच. फक्त चवीत थोडा बदल म्हणून एक प्रयोग. पाहू या वांगी-बटाट्याची आंबट व गोड भाजीची पाककृती.
रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
साहित्य:
- २ काटेरी वांगी
- २ बटाटे
- २ कांदे (चिरलेले)
- २ टोमॅटो (चिरलेले)
- ४-५ लसूण पाकळ्या
- १-२ हिरव्या मिरच्या
- १/२ वाटी खोवलेला नारळ
- २ टीस्पून धने पावडर
- २ टीस्पून तीळ
- १ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट (ऐच्छिक)
- १/४ टीस्पून हळद
- १/४ टीस्पून हिंग
- १ टेस्पून गूळ
- ३-टेस्पून चिंचेचा कोळ
- ३-४ टेस्पून तेल
- मीठ चवीनुसार
कृती:
१) एका कढईत थोड्या तेलावर चिरलेला कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, तीळ, धने पावडर, हळद, हिंग, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट, खोवलेला नारळ व चिरलेले टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परता. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
२) बटाट्याची सालं काढून, बटाट्याचे उभे काप करून घ्या. वांग्याचे देठ काढून, वांग्याचे पण उभे काप करून घ्या. चिंच थोड्या पाण्यात भिजवून चिंचेचा कोळ काढून ठेवा. चिरलेली वांगी व बटाटे १० मिनिटे पाण्यात ठेवा. नंतर पाण्यातून काढून एका कापडावर ठेवून त्यातील पाणी काढून टाका. काप कोरडे झाल्यावर, सावकाश मध्यम आंचेवर तेलात तळा व बाजूला ठेवा.
३) एका कढईत तेल तापवून, त्यात वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात चिंचेचा कोळ व गूळ घाला. थोडेसे पाणी घालून, ग्रेव्ही आपल्या आवडीनुसार दाटसर ठेवा आणि चवीनुसार मीठ घाला . ग्रेव्ही उकळली की, त्यात तळलेली वांगी व बटाट्याचे काप घालून एकत्र करा. तयार भाजीला एक उकळी येऊ द्या.
४) गरम गरम वांगी बटाटा भाजी; भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.
# Brinjal -Potato Curry (with Jaggery and Tamrind) #
Stuffed Brinjal Curry (Bharali Vangi) is a traditional and famous Maharashtrian dish. Stuffed Brinjal Curry is spicy, tasty & delicious and is served with Bhakari (flat round bread), Garlic Chutney & Green Chili Chutney (Thecha). Stuffed Brinjal Curry with Bhakari is a good combination for foodies. I always use Goda masala (It is a Maharashtrian spice mix for cooking) to make Stuffed Brinjal Curry. Today, for a change, I have used Brinjal with potatoes, chopped them vertically and then deep fried it in Oil. I also added Tamrind pulp for tangy taste. All ingredients for preparing this curry, are generally available at home. Let's see the simple recipe of Brinjal-Potato Curry (with Jaggery & Tamrind).
If you like this recipe, don't forget to like, share, comment and subscribe my blog.
Ingredients:

- 2 Brinjals (Eggplant)
- 2 Potatoes
- 2 chopped Onion
- 2 chopped Tomatoes
- 4-5 Garlic Cloves
- 1-2 Green Chilies
- 1/2 cup Grated Coconut
- 2 tsp Coriander Powder
- 2 tsp Sesame Seeds
- 1 tsp Red Chili Powder
- 1 tsp Kashmiri Red Chili Powder (Optional)
- 1/4 tsp Turmeric Powder
- 1/4 tsp Asafoetida
- 1 tsp Jaggery
- 3 tbsp Tamrind Pulp
- Oil (for tempering and frying)
Method:
1) Heat Oil in a pan and sauté Onion for 2-3 minutes. Then add Garlic Cloves, Green Chilies, Coriander Powder, Sesame Seeds, Turmeric Powder, Red chili powder, Kashmiri Red Chili Powder (Optional), Grated Coconut & Tomatoes and fry it for 2-3 minutes. Cool it down and grind the same in a mixer. Then keep it aside.
2) Peel Potatoes and cut them vertically. Remove the stalk of the Brinjals and cut them vertically. Put the Brinjals & Potatoes in water for 10 minutes. Drain the water and dry them with a clean cotton cloth. Deep fry the Brinjals and Potatoes in hot oil. Keep it aside. Soak the Tamrind in sufficient water, mash it and extract the Pulp from it. Keep it aside.
3) Heat 2-3 tbsp Oil in a pan, add ground masala in it and sauté for 2-3 minutes or until Oil separates from the mixture. Add Tamrind Pulp, Jaggery and little water. Mix it well. Adjust the consistency of gravy and then add Salt as per taste. Mix it well and let it boil. Now add fried Brinjals and Potatoes and boil it again for a minute.
4) Serve hot Brinjal-Potato Curry (with Jaggery and Tamrind) with Bhakari or Chapati and Garlic Chutney.
Hmm... Looks interesting.
ReplyDelete