मिसळ
मिसळ प्रकार बहुतेक सगळ्यांनाच आवडतो. कुणाला खुप झणझणीत तर कुणाला साधारण तिखट आवडते. मिसळप्रेमी बरेच आहेत. चांगली मिसळ खाण्यासाठी मिसळप्रेमी चांगली ठिकाणं शोधून मिसळीचा आस्वाद घेतातच. काही जण यात कांदे पोहे त्यावर फरसाण, मटकीची उसळ, झणझणीत कट व बारीक चिरलेला कांदा घालून पण खातात खूप मस्त लागते. आज मिसळीची रेसिपी देत आहे.
उसळीकरिता साहित्य:
१) मोड आलेली मटकी व भिजवलेले शेंगदाणे थोडे मीठ घालुन कुकरमध्ये शिजवून घ्या.
२) एका भांड्यात तेल तापवा. तापलेल्या तेलात प्रथम थोडीशी साखर व १ चमचा लाल तिखट, कढिपत्याची पानं व चिरलेला कांदा घालुन परता. त्यात चिरलेला टोमॅटो घालून परता. टोमॅटोला तेल सुटू लागले की, शिजवलेली मटकी व शेंगदाणे घालून परता. चवीनुसार मीठ घाला.
३) आवश्यकतेनुसार पाणी घालुन उकळवा.
सर्व्हिंगकरीता:
१) कांदा उभा चिरून थोड्या तेलावर परतून घ्या. किसलेले सुके खोबरं घालून थोडे परता. लसुण पाकळ्या व थोडेसे आलं घाला.
२) काळे मिरे, लवंगा, दालचिनीचा तुकडा, जिरं, धनेपूड मिक्सरमध्ये बारीक वाटा. त्यात परतलेला कांदा व थोडे पाणी घालुन बारीक वाटा.
३) एका भांड्यात ३-४ टे. स्पून तेल तापवून त्यात १/२ लहान चमचा साखर व लाल तिखट घाला. त्यात वाटलेला मसाला, गरम मसाला / मिसळ मसाला व चवीनुसार मीठ घालून परता. तेल सुटू लागले की, त्यात थोडे पाणी घालुन आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालुन उकळवा.
४) एका प्लेटमध्ये फरसाण घाला त्यावर १ चमचा उकडलेल्या बटाट्याचे मिश्रण घाला नंतर मटकीची उसळ व कट (आवडीनुसार) घाला. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव व लिंबाची फोड ठेवून पावाबरोबर गरम-गरम मिसळ सर्व्ह करा.
उसळीकरिता साहित्य:
- २ वाट्या मोड आलेली मटकी (मिक्स भिजवलेली कडधान्ये सुद्धा चालतील.)
- १/२ वाटी भिजवलेले शेंगदाणे
- १ मध्यम चिरलेला कांदा
- १ बारीक चिरलेला टोमॅटो
- ५-६ कढिपत्याची पानं
- थोडीशी साखर
- १ चमचा लाल तिखट
- फोडणीकरिता तेल
- मीठ चवीनुसार
१) मोड आलेली मटकी व भिजवलेले शेंगदाणे थोडे मीठ घालुन कुकरमध्ये शिजवून घ्या.
२) एका भांड्यात तेल तापवा. तापलेल्या तेलात प्रथम थोडीशी साखर व १ चमचा लाल तिखट, कढिपत्याची पानं व चिरलेला कांदा घालुन परता. त्यात चिरलेला टोमॅटो घालून परता. टोमॅटोला तेल सुटू लागले की, शिजवलेली मटकी व शेंगदाणे घालून परता. चवीनुसार मीठ घाला.
३) आवश्यकतेनुसार पाणी घालुन उकळवा.
सर्व्हिंगकरीता:
- फरसाण २५० ग्रॅम
- १ मध्यम बारीक चिरलेला कांदा
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १०० ग्रॅम बारीक शेव
- एका लिंबाच्या फोडी
- ३-४ उकडलेले बटाटे मॅश करून त्याला आलं लसुण मिरचीची पेस्ट लावून थोडीश्या तेलात परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.
- १ मध्यम कांदा
- २-३ चमचे किसलेले सुके खोबरं
- ५-६ काळे मिरे
- ५-६ लवंगा
- एक दालचिनीचा तुकडा
- १/२ चमचा जिरं
- १ चमचा धनेपूड
- ५-६ लसुण पाकळ्या
- थोडेसे आलं
- १ टी. स्पून लाल तिखट (कमी जास्त आवडीनुसार वापरा)
- १/२ वाटी तेल
- १ चमचा गरम मसाला / मिसळ मसाला
- मीठ चवीनुसार
१) कांदा उभा चिरून थोड्या तेलावर परतून घ्या. किसलेले सुके खोबरं घालून थोडे परता. लसुण पाकळ्या व थोडेसे आलं घाला.
२) काळे मिरे, लवंगा, दालचिनीचा तुकडा, जिरं, धनेपूड मिक्सरमध्ये बारीक वाटा. त्यात परतलेला कांदा व थोडे पाणी घालुन बारीक वाटा.
३) एका भांड्यात ३-४ टे. स्पून तेल तापवून त्यात १/२ लहान चमचा साखर व लाल तिखट घाला. त्यात वाटलेला मसाला, गरम मसाला / मिसळ मसाला व चवीनुसार मीठ घालून परता. तेल सुटू लागले की, त्यात थोडे पाणी घालुन आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालुन उकळवा.
४) एका प्लेटमध्ये फरसाण घाला त्यावर १ चमचा उकडलेल्या बटाट्याचे मिश्रण घाला नंतर मटकीची उसळ व कट (आवडीनुसार) घाला. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव व लिंबाची फोड ठेवून पावाबरोबर गरम-गरम मिसळ सर्व्ह करा.
Comments
Post a Comment