सोया-चीझ-बाॅल्स

साहित्य:

  • १ वाटी सोयाबीनचे दाणे ( ८-१० तास भिजवून ठेवा.)
  • ३ उकडलेले बटाटे
  • १ चमचा आलं-मिरचीची पेस्ट
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा तंदूरी मसाला
  • २ चमचे धने पावडर
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा हळद
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/२ वाटी नाचणीचे पीठ
  • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चिमुटभर खायचा सोडा
  • १ वाटी ब्रेड क्रम्पस
  • २-३ चमचे काॅर्नप्लोअर 
  • २ चीझचे क्युब
  • मीठ चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी

कृती:

१)  सोयाबीनचे दाणे मिक्सरमध्ये पाणी न घालता भरड वाटून घ्या. वाटलेले सोयाबीन एका भांड्यात काढून घ्यावे.

२) त्यात उकडलेले बटाटे मॅश करून घाला. आलं-मिरचीची पेस्ट, चाट मसाला, तंदूरी मसाला, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, १/२ वाटी नाचणीचे पीठ, १/२ वाटी ब्रेड क्रम्पस, बारीक चिरलेली कोथिंबीर, खायचा सोडा व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा. मिश्रण कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी घालून एकत्र करा. 

३) एका चीझ क्युबचे ८-९ छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या.

४) तयार मिश्रणाची वाटी करून त्यात चीझचा तुकडा भरून त्याचे बाॅल्स करून घ्या.

५) २-३ चमचे काॅर्नप्लोअर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या.

६) तयार बाॅल्स काॅर्नप्लोअरच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्पस मध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे व शेझवान साॅस बरोबर सर्व्ह करावे.



रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.


Comments

Popular Posts