उपासाचे थालीपीठ व रताळ्याचा किस
उपासाचे थालीपीठ करण्यासाठी उपासाची भाजणी आहे.
उपासाची भाजणी:
साहित्य:
कृती:
वरील सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक दळावे.
उपासाचे थालीपीठ:
साहित्य:
कृती:
१) वरील साहित्य एकत्र करून जरुरीनुसार पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या.
२) एका केळीच्या पानावर/ प्लास्टिकच्या कागदावर थालीपीठ थापा व तव्यावर तेल/ तूप सोडून दोन्ही बाजूंनी शेका.
वरील साहित्यात ३-४ थालीपीठं होतात.
झटपट शेंगदाणा चटणी:
साहित्य:
कृती:
वरील साहित्य एकत्र करून घ्या. आवश्यकतेनुसार घट्ट किंवा पातळ करा.
उपासाच्या थालीपीठाबरोबर तयार चटणी किंवा दही
सर्व्ह करा.
रताळ्याचा किस
साहित्य:
कृती:
१) रताळी पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यावीत. सालं काढून पुन्हा धुवून किसणीने किसून घ्या.
२) एका कढईत तेल/तूप तापवून त्यात जिरं व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. रताळ्याचा किस घाला. शेंगदाण्याचं कूट, साखर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या. कढईवर एक झाकण ठेवून १-२ वाफा देऊन रताळ्याचा किस शिजवून घ्या.
३) तयार रताळ्याचा किस दह्याबरोबर सर्व्ह करा.
उपासाची भाजणी:
साहित्य:
- १ वाटी भगर
- १ वाटी साबुदाणा
- १चमचा जिरं
कृती:
वरील सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्यावे. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक दळावे.
उपासाचे थालीपीठ:
साहित्य:
- २ वाट्या उपासाची भाजणी
- १ उकडलेला बटाटा
- १/२ वाटी शिंगाडा पीठ ( ऐच्छिक)
- १/२ वाटी शेंगदाण्याचे कूट
- १ चमचा लाल तिखट /१चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट
- साजूक तूप / रिफाईंड शेंगदाण्याचं तेल जरुरीनुसार
- मीठ चवीनुसार
कृती:
१) वरील साहित्य एकत्र करून जरुरीनुसार पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या.
२) एका केळीच्या पानावर/ प्लास्टिकच्या कागदावर थालीपीठ थापा व तव्यावर तेल/ तूप सोडून दोन्ही बाजूंनी शेका.
वरील साहित्यात ३-४ थालीपीठं होतात.
झटपट शेंगदाणा चटणी:
साहित्य:
- १/२ वाटी शेंगदाण्याचे कूट
- १ चमचा लाल तिखट
- २-३ चमचे दही/ १/२ वाटी ताक
- मीठ चवीनुसार
कृती:
वरील साहित्य एकत्र करून घ्या. आवश्यकतेनुसार घट्ट किंवा पातळ करा.
उपासाच्या थालीपीठाबरोबर तयार चटणी किंवा दही
सर्व्ह करा.
रताळ्याचा किस
साहित्य:
- १/२ किलो रताळी
- १ चमचा जिरं
- ४-५ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- १ चमचा साखर
- २-३ चमचे शेंगदाण्याचं कूट
- मीठ चवीनुसार
- साजूक तूप / रिफाईंड शेंगदाण्याचं तेल जरुरीनुसार
कृती:
१) रताळी पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यावीत. सालं काढून पुन्हा धुवून किसणीने किसून घ्या.
२) एका कढईत तेल/तूप तापवून त्यात जिरं व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. रताळ्याचा किस घाला. शेंगदाण्याचं कूट, साखर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या. कढईवर एक झाकण ठेवून १-२ वाफा देऊन रताळ्याचा किस शिजवून घ्या.
३) तयार रताळ्याचा किस दह्याबरोबर सर्व्ह करा.
Masta... Attach yete ga taste karayla.. Asa asel ter roj upwaas Karen 😄😛😛😛😛
ReplyDeleteJarur ye
DeleteMsst
ReplyDeleteThanks Vivek
DeleteThanks Vivek
Delete