मेथीच्या पोळ्या

माझी एक मैत्रीण नेहमीच्या जेवणात ब-याचदा मेथीच्या पोळ्या करत असे. मलाही मेथीच्या पोळ्या खूप आवडतात म्हणून मुद्दाम मी मैत्रीणीकडून शिकून घेतल्या. मेथी तर महिलांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. मेथीच्या पोळ्या व त्या बरोबर शेंगदाण्याच्या चटणी खाल्ली जाते.  मेथी पावडर असूनसुध्दा पोळ्यांची चव कडू लागत नाही. पाहू या मेथीच्या पोळ्या व शेंगदाण्याची चटणीची रेसिपी. अगदीच सोपी आणि पटकन होणारी पौष्टिक व चविष्ट रेसिपी.

साहित्य:
  • १/२ वाटी मेथीची पावडर
  • १/४ चमचा हळद
  • ३ वाट्या गव्हाचे पीठ
  • मीठ चवीनुसार
  • १/२ वाटी तेल
  • पाणी 

कृती: 

१) एका भांड्यात मेथीची पावडर घ्या. त्यात हळद व १/२ वाटी पाणी घालून चमच्याने ढवळून त्याची पेस्ट करा. गरज वाटली तर पुन्हा थोडेसे पाणी घाला व मिश्रण २ तास झाकून ठेवा.

२) मेथीच्या पेस्टमध्ये गव्हाचे पीठ व चवीनुसार मीठ घालून मिश्रण सारखे करून घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर कणिक भिजवा. थोडे तेल घालून कणिक मळा.

३) नेहमी करतो तशाच पोळ्या करून तव्यावर तेल लावून पोळ्या शेकून घ्या.


शेंगदाण्याची चटणी

साहित्य:

  • १ वाटी शेंगदाणे
  • ६-७ लसूण पाकळ्या
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १ वाटी कोथिंबीर
  • थोडेसे तेल
  • मीठ चवीनुसार
  • पाणी गरजेनुसार

कृती:

१) एका कढईत व १ चमचा तेल घालून शेंगदाणे भाजावे. भाजलेले शेंगदाणे एका भांड्यात काढून घ्यावे.

२) हिरव्या मिरच्यांचे २-२ तुकडे करून त्याही कढईत १/२ चमचा तेल घालून भाजून घ्याव्या. (हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या.)

३) मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीर व चवीनुसार मीठ व पाणी घालून चटणी वाटून घ्यावी. चटणी थोडी पातळ करावी.
(आवडत असेल तर चटणीत १-२ चमचे कच्चे तेल घालून चटणी मिक्स करावी.)

तयार मेथीच्या पोळ्या व शेंगदाण्याची चटणी सर्व्ह करावी.

रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.


Comments

Post a Comment