गोडाचा शाही शिरा
साहित्य:
कृती:
१) एका कढईत २-३ चमचे साजूक तूप घालून रवा खमंग भाजून घ्यावा.
२) भाजलेल्या रव्यामध्ये चिमुटभर मीठ व १ वाटी उकळीचे पाणी घालून रवा फुलवून घ्यावा. रवा कोरडा वाटल्यास अजून थोडे पाणी घालावे.( उकळीचे पाणी घातल्याने रवा छान फुलतो.)
३) भिजवलेले बदाम व १/२ कप दूध एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्या. (६-७ तास बदाम भिजवून बदामाची पेस्ट सालासकट करावी.)
४) तयार बदाम पेस्ट, साखर व केशर-वेलची सिरप रव्यामध्ये घाला. ३-४ चमचे साजूूूक तूप सोडा. काजूचे तुकडे व बेदाणे घालून मिश्रण ढवळून त्यावर झाकण ठेवा. मध्यम आंचेवर एक वाफ येऊ द्यावी. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे दूध व तूप घालून शिरा ढवळून एक वाफ द्या.
५) गरम-गरम शाही शिरा सजावट करून सर्व्ह करा. अशी सजावट लहान मुलांना नक्कीच आवडेल.
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
- १ वाटी मध्यम रवा
- १ वाटी साखर
- १५-१६ भिजवलेले बदाम
- साजूक तूप जरुरीनुसार
- १ ते सव्वा वाटी दुध
- दिड वाटी पाणी
- २ चमचे केशर-वेलची सिरप / वेलची पावडर व केशर
- १०-१२ काजूचे तुकडे
- १/४ वाटी बेदाणे
- मीठ चिमुटभर
कृती:
१) एका कढईत २-३ चमचे साजूक तूप घालून रवा खमंग भाजून घ्यावा.
२) भाजलेल्या रव्यामध्ये चिमुटभर मीठ व १ वाटी उकळीचे पाणी घालून रवा फुलवून घ्यावा. रवा कोरडा वाटल्यास अजून थोडे पाणी घालावे.( उकळीचे पाणी घातल्याने रवा छान फुलतो.)
३) भिजवलेले बदाम व १/२ कप दूध एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्या. (६-७ तास बदाम भिजवून बदामाची पेस्ट सालासकट करावी.)
४) तयार बदाम पेस्ट, साखर व केशर-वेलची सिरप रव्यामध्ये घाला. ३-४ चमचे साजूूूक तूप सोडा. काजूचे तुकडे व बेदाणे घालून मिश्रण ढवळून त्यावर झाकण ठेवा. मध्यम आंचेवर एक वाफ येऊ द्यावी. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे दूध व तूप घालून शिरा ढवळून एक वाफ द्या.
५) गरम-गरम शाही शिरा सजावट करून सर्व्ह करा. अशी सजावट लहान मुलांना नक्कीच आवडेल.
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
Comments
Post a Comment