ब्रेड रोल

साहित्य:
  • ब्रेडचे स्लाईस आवश्यकतेनुसार
  • ३-४ उकडलेले बटाटे
  • १/२ वाटी उकडलेले मटार 
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • थोडेसे आलं
  • १/४ चमचा हळद
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल
कृती:

१) उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. त्यात १/२ वाटी उकडलेले मटार घाला.

२) थोडी हळद, आलं व हिरव्या मिरच्याची पेस्ट करून बटाट्याच्या मिश्रणात घाला.

३) बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घाला.

४)ब्रेडचा स्लाईस पाण्यात बुडवून तळहातावर दाबुन पाणी काढा व त्यात तयार मिश्रण भरून ब्रेडला लांबट आकार द्या.

५) एका कढईत तेल तापवुन तयार ब्रेड रोल तळुन घ्या.

६) तयार ब्रेड रोल साॅस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.



रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.

Comments

Post a Comment

Popular Posts