शाही पुरण

शाही पुरण

आज श्रावण महिन्यातला शुक्रवार.  आमच्याकडे घरातील मुलांना श्रावण महिन्यातल्या  शुक्रवारी औक्षण करण्याची पध्दत आहे. माझी आई एका शुक्रवारी न वाटलेले शाही-पुरण करायची. याला रावण पूरण असेही म्हणतात.  आम्हाला फार आवडत असे. त्याचे साहित्य व कृती पाहुया.
१ वाटी चणाडाळ शिजवून घ्या. त्यात पाऊण गुळ घालून पुरण शिजवून घ्या.(चणाडाळ अख्खीच ठेवा.) पुरण कोरडे झाले की, त्यात काजुचे तुकडे, थोडीशी भाजलेली खसखस, थोडेसे बेदाणे, जायफळ व वेलचीची पावडर घाला. खायला देतांना साजुक तुप घालुन द्या. 

.

Comments

Popular Posts