उकड

पोहे व उपमा आपण नेहमीच करतो. कमीत कमी साहित्यात अगदी १० मिनिटांत तयार होणारा पोटभरीचा एक पारंपरिक पदार्थ म्हणजेच - उकडथोड्याश्या आंबट-गोड -तिखट चवीची  उकड माझ्याकडे सगळ्यांना खूप आवडते. घरात ताक केले मी हमखास उकड करते. तुम्ही पण करून पहा आवडते का ? 

साहित्य:

  • २ १/२ वाट्या तांदुळाचे पीठ
  • तीन वाट्या ताक
  • १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • ५-६ कडिपत्याची पाने
  • ३-४ टे. स्पुन तेल
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • १/२ चमचा साखर (ऐच्छिक )

फोडणीकरिता:

तेल २-३ टे . स्पून ,१/४ चमचा मोहरी, थोडेसे जिरं, १/४ चमचा हळद, चिमुटभर हिंग

कृती:

१) एका कढईत तेल तापवा. त्यात १/४ चमचा मोहरी, थोडेसे जिरं, १/४ चमचा हळद, चिमुटभर हिंग घालून फोडणी करा. हिरव्या मिरच्यांचे तुकडे व ५-६ कडिपत्याची पाने घाला. तीन वाट्या ताक घाला. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा साखर व चवीनुसार मीठ घालुन मिश्रणाला उकळी येऊ द्या. 

२) उकळलेल्या तयार मिश्रणात थोडे थोडे  तांदुळाचे पीठ घालून चमच्याने ढवळुन मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. झाकण ठेवून एक २-३ मिनिटे वाफ द्या.  तांदुळाचे पीठ शिजले पाहिजे मिश्रण कढईला चिकटणार नाही याची काळजी घ्या. (नॉनस्टिकची कढई वापरू शकता.) 

३) डिशमध्ये सर्व्ह करतांना त्यावर १-२ चमचे कच्चे तेल घालुन खायला द्या.









Comments

Popular Posts