शेझवान-चीझ-टोस्ट सॅन्डवीच

सकाळी-सकाळी डब्यात काय द्यावे हा प्रश्न पडला. काय-काय सामान घरात आहे  हे बघितल्यावर   फ्रिजमध्ये मला  स्लाईस ब्रेड दिसला. त्याच्या मागे चिझ व शेझवान चटणी दिसली. मस्त आयडिया सुचली आणि पटकन शेझवान-चीझ-टोस्ट सॅन्डवीच केले. आमच्याकडे सगळ्यांनी आवडीने खाल्ले. तुम्हाला पण आवडेल.

साहित्य:

  • ब्रेडचे स्लाईस आवश्यकतेनुसार
  • २-३ चीझचे क्युब
  • शेझवान चटणी आवश्यकतेनुसार
  • बटर आवश्यकतेनुसार

कृती:

) ब्रेडच्या स्लाईसला शेझवान चटणी लावा.

२) तयार ब्रेडवर भरपूर चीझ किसुन घाला.

३) दुस-या ब्रेडच्या स्लाईसला शेझवान चटणी लावून ठेवा.

४) तयार सॅडविचला दोन्ही बाजुंना बटर लावून सॅडविच टोस्ट करून सर्व्ह करा.

चीझ मेल्ट झाल्यामुळे सॅन्डविच खूपच मस्त लागतो. लहान व मोठ्यांना खूप आवडतो व कमी वेळात पटकन तयार होतो .

Comments

Popular Posts