आलु-पराठा
साहित्य :
सारणासाठी:
१) एका भांड्यात बटाटे मॅश करून घ्या. (बटाट्याच्या गुठळ्या ठेवू नका.)
२) त्यात १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा आमचुर पावडर,१/२ चमचा जिरंपुड, १ चमचा धनेपुड,२ चमचे कसुरी मेथी, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार घालून मिश्रण एकत्र करा.
३) एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या त्यात मीठ व थोडेसे तेल घेऊन सैलसर कणिक भिजवुन घ्या.
४) तयार कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटी करून तयार सारण भरा व पराठा लाटा.
५) तव्यावर शेकतांना दोन्ही बाजुंनी साजुक तुप किंवा बटर लावून शेका.
६) गरमागरम पराठा दही, साॅस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
( कोथिंबीर घातली नाही तरी चालेल फक्त कसुरी मेथीचा स्वाद सुद्धा खुप छान लागतो. लसुण व मिरची पेस्ट आपल्या आवडीनुसार घालु शकता.)
सारणासाठी:
- ४-५ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
- १/२ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा गरम मसाला
- १/२ चमचा आमचुर पावडर
- १/२ चमचा जिरंपुड
- १ चमचा धनेपुड
- २ चमचे कसुरी मेथी
- थोडीशी चिरलेली कोथिंबीर ( ऐच्छिक)
- मीठ चवीनुसार
- गव्हाचे पीठ ३ वाट्या
- थोडेसे तेल
- मीठ चवीपुरते
१) एका भांड्यात बटाटे मॅश करून घ्या. (बटाट्याच्या गुठळ्या ठेवू नका.)
२) त्यात १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा आमचुर पावडर,१/२ चमचा जिरंपुड, १ चमचा धनेपुड,२ चमचे कसुरी मेथी, थोडीशी चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार घालून मिश्रण एकत्र करा.
३) एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या त्यात मीठ व थोडेसे तेल घेऊन सैलसर कणिक भिजवुन घ्या.
४) तयार कणकेचा गोळा घेऊन त्याची वाटी करून तयार सारण भरा व पराठा लाटा.
५) तव्यावर शेकतांना दोन्ही बाजुंनी साजुक तुप किंवा बटर लावून शेका.
६) गरमागरम पराठा दही, साॅस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.
( कोथिंबीर घातली नाही तरी चालेल फक्त कसुरी मेथीचा स्वाद सुद्धा खुप छान लागतो. लसुण व मिरची पेस्ट आपल्या आवडीनुसार घालु शकता.)
Comments
Post a Comment