तिखट-मीठाच्या पोळ्या

सकाळी डब्यात काय द्यावे हा प्रश्न पडला आणि एकदम लहानपणी खाल्लेल्या तिखटमीठाच्या पोळ्यांची आठवण झाली. लगेच आईला डोळ्यासमोर ठेवून तयारीला लागले. सगळे साहित्य घरात असल्याने अगदी २०-२५ मिनिटांत तिखटमीठाच्या पोळ्या तयार झाल्या.

साहित्य:

  • गव्हाचे पीठ २ वाट्या
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १ चमचा ओवा
  • १ चमचा तीळ
  • मीठ चवीनुसार
  • थोडीशी हळद
  • थोडासा हिंग
  • तेल आवश्यकतेनुसार


कृती:

१) वरील सर्व साहित्य एकत्र करून कणिक भिजवुन घ्या. थोडे तेल लावुन कणिक मळुन घ्या.

२) तयार कणकेचे गोळे करून पोळ्या करून तेल लावून तव्यावर शेका.

३) तयार पोळ्या कैरीच्या लोणच्या बरोबर सर्व्ह करा.










Comments

Popular Posts