खरवस
माझे काही कामानिमित्य पुण्याला मावशीकडे जाणे झाले. तिच्या शेजारी असलेल्या गोठ्यात चीक विकायला होता. माझ्या घरात सगळ्यांना खरवस खूप आवडतो म्हणून लगेचच एक लिटर चीक विकत घेतला. घरी आल्यावर थोडी साखर घालुन तर थोडा ओला नारळ व गुळ घालुन चीकाचा खरवस केला. तरीसुद्धा थोडा चीक शिल्लक होता. मग एकदम आठवले कि, माझी आई चिकाच्या वड्या सुद्धा करायची. सगळे साहित्य घेऊन वड्या केल्या आणि चांगल्यासुद्धा झाल्या. खरवसापेक्षा वड्या जास्त दिवस टिकतात. आज मी केलेल्या तिन्ही प्रकारच्या रेसिपी देत आहे. चीक पहिल्या दिवसाचा आहे म्हणून दूध सुद्धा चीकाइतकेच घेतले आहे.
(१) खरवसच्या वड्या :
साहित्य :
कृती :
१) सर्वप्रथम नुसता चीक कुकरच्या भांड्यात शिजवून घ्या. कोमट झाला कि, बाहेर काढून किसणीने किसून घ्या.
२) एका कढईत वाफ़वुन किसलेला चीक घ्या. त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून मिश्रण एकत्र करा.
३)तयार मिश्रण मध्यम आचेवर आटवत ठेवा. सतत ढवळत रहा. घट्ट गोळा झाला कि, तूप लावलेल्या ताटलीत थापून वड्या पाडा.
(२) खरवस (साखरेचा) :
साहित्य :
१) वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यातील साखर विरघळून घ्यावी.
२) कुकरच्या डब्यात सगळे मिश्रण ओतावे व कुकरमध्ये पाणी घालून त्यात कुकरचा डबा ठेवावा. शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवावे.
३) गार झाल्यावर वड्या पाडून फ्रिजमध्ये ठेवा व गारे-गार खरवस सर्व्ह करावा.
(३) खरवस (गुळाचा):
साहित्य :
(१) खरवसच्या वड्या :
साहित्य :
- २ वाट्या चीक
- २ वाट्या पेक्षा थोडी कमी पिठीसाखर (आवडीनुसार थोडी जास्त घेऊ शकता.)
- १/४ टी .स्पून वेलची पावडर
- थोडेसे साजूक तूप
कृती :
१) सर्वप्रथम नुसता चीक कुकरच्या भांड्यात शिजवून घ्या. कोमट झाला कि, बाहेर काढून किसणीने किसून घ्या.
२) एका कढईत वाफ़वुन किसलेला चीक घ्या. त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालून मिश्रण एकत्र करा.
३)तयार मिश्रण मध्यम आचेवर आटवत ठेवा. सतत ढवळत रहा. घट्ट गोळा झाला कि, तूप लावलेल्या ताटलीत थापून वड्या पाडा.
साहित्य :
- १/२ लिटर चीक
- १/२ लिटर दूध
- २ वाट्या साखर (आवडीनुसार थोडी जास्त घेऊ शकता.)
- १/२ टी .स्पून वेलची पावडर
कृती :
१) वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यातील साखर विरघळून घ्यावी.
२) कुकरच्या डब्यात सगळे मिश्रण ओतावे व कुकरमध्ये पाणी घालून त्यात कुकरचा डबा ठेवावा. शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवावे.
३) गार झाल्यावर वड्या पाडून फ्रिजमध्ये ठेवा व गारे-गार खरवस सर्व्ह करावा.
(३) खरवस (गुळाचा):
साहित्य :
- १/२ लिटर चीक
- १/२ लिटर दूध
- १ मध्यम खोवलेला नारळ
- २ वाट्या गुळ (आवडीनुसार थोडा जास्त घेऊ शकता.)
- १/२ टी .स्पून वेलची पावडर
कृती :
१) वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यातील गूळ विरघळून घ्यावा .
२) कुकरच्या डब्यात सगळे मिश्रण ओतावे व कुकरमध्ये पाणी घालून त्यात कुकरचा डबा ठेवावा. शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवावे.
३) गार झाल्यावर वड्या पाडून फ्रिजमध्ये ठेवा व गारे-गार खरवस सर्व्ह करावा.
२) कुकरच्या डब्यात सगळे मिश्रण ओतावे व कुकरमध्ये पाणी घालून त्यात कुकरचा डबा ठेवावा. शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवावे.
३) गार झाल्यावर वड्या पाडून फ्रिजमध्ये ठेवा व गारे-गार खरवस सर्व्ह करावा.
Comments
Post a Comment