मिक्स ढोकळा
साहित्य:
फोडणीकरिता:
३-४ टे. स्पुन तेल, थोडेसे जिरं, मोहरी, हिंग व ५-६ कडिपत्याची पाने
- १ वाटी इडली रवा
- १/२ वाटी उडिद डाळ
- १/२ वाटी चणाडाळ
- १/२ वाटी अख्खे मुग
- १/२ इंच आलं व २-३ हिरव्या मिरच्यांची पेस्ट (आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरू शकता.)
- १/२ लिंबाचा रस
- थोडासा खायचा सोडा
- मीठ चवीनुसार
फोडणीकरिता:
३-४ टे. स्पुन तेल, थोडेसे जिरं, मोहरी, हिंग व ५-६ कडिपत्याची पाने
सजावटीकरिता :
खोवलेला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) इडली रवा, उडिदडाळ, चणाडाळ व अख्खे मुग एकत्र करून धुवून ७-८ तास पाण्यात भिजवावे.
२) नंतर सगळे मिश्रण प्रमाणात पाणी घालून इडली पिठाप्रमाणे बारीक वाटुन पुन्हा ७-८ तास झाकुन ठेवावे.
३) ७-८ तासानंतर ढोकळा करतांना त्यात आलं व मिरची पेस्ट, १/२ लिंबाचा रस व मीठ चवीनुसार घालुन मिश्रण एकत्र करा व थोडासा खायचा सोडा घाला.
४) ढोकळाच्या थाळीला तेल लावून घ्या व कुकरमध्ये पाणी उकळत ठेवा. तयार मिश्रण थाळीत ओता व १०-१२ मिनिटे कुकरमध्ये वाफवा.
५) ढोकळा तयार झाला की, तेल तापवुन जिरं, मोहरी, हिंग व कडिपत्याची फोडणी द्या. वरून खोवलेला नारळ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा .
६) गरमा-गरम ढोकळा नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

Comments
Post a Comment