आळूवडी
महाराष्ट्रात व गुजरातमध्ये आळूवडी केली जाते. पावसाळ्यात आळूची पानं सहज मिळतात. श्रावण व भाद्रपद महिन्यामध्ये सणासुदीला आळूवडीला विशेष महत्त्व आहे. शहरात तर आळूवडीचे तयार उंडे विकत मिळतात घरी आणून वड्या कापून गरम तेलात तळल्या की खायला तयार. आळूवडी सारखा चमचमीत पदार्थ प्रत्येकाला आवडतोच. आळूवडी चवीला आंबट, गोड व तिखट असते. आळूवडी करायला लागणारे साहित्य घरात सहज उपलब्ध असते फक्त बाजारातून आळूवडीची पानं आणली की झालं. आळूवडी करिता बाजारात पनवेली आळूची पानं मिळतात. महाराष्ट्रात आळूवडी वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते.
साहित्य:
१) आळूची पानं स्वच्छ धुवून, पुसून घ्या व त्याची देठं काढून घ्या. पानाच्या मागच्या बाजूवर लाटणे फिरवून शिरा सारख्या करा. जाड शिरा सुरीने काढून टाका, पान फाटणार नाही याची काळजी घ्या.
२) एका भांड्यात चणाडाळीचे पीठ, तांदूळाचे पीठ, आलं-मिरचीची पेस्ट, लाल तिखट, गोडा मसाला, चिंचेचा कोळ, बारीक चिरलेला गुळ, तीळ, हळद, चिमुटभर हिंग व चवीनुसार मीठ घाला. लागेल तसे पाणी घालून भजीच्या पीठापेक्षा थोडे घट्ट मिश्रण तयार करा.
(तयार मिश्रणातील तिखट-मीठाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यावे.)
३) आळूचे एक पान घेऊन पानाच्या मागच्या बाजूस वरील मिश्रण पसरवा. दुसरे पान लावताना पानाचे टोक वरील बाजूस येईल असे ठेवून पातळसर मिश्रण लावून घ्यावे. तिसरे पान लावताना पानाचे टोक खालील बाजूस ठेवून त्यावर पातळसर मिश्रण लावावे. एकावर एक अशी ४-५ पानं ठेवून मिश्रण लावून घ्यावे. मिश्रण लावलेली पानं कडेेेने दुमडुन त्यावर मिश्रण लावून पानांचा घट्ट रोल करा व दो-याने गुंडाळून घ्या. उरलेल्या पानांचे असेच रोल करून घ्या.
४) एका चाळणीत ठेवून कुकरमध्ये १५-२० मिनिटे वाफवा. मोदकपात्रात सुध्दा उंडे वाफवू शकता. गार झाल्यावर वड्या कापून गरम तेलात तळा.
साहित्य:
- १०-१२ आळूवडीची पानं
- २ ते अडीच वाट्या चणाडाळीचे पीठ
- १ टेबलस्पून तांदूळाचे पीठ
- १ टी स्पून आलं-मिरचीची पेस्ट
- १ टी स्पून लाल तिखट
- २ टी स्पून गोडा मसाला
- १/२ वाटी चिंचेचा कोळ
- १/२ वाटी बारीक चिरलेला गुळ
- १ टेबलस्पून तीळ
- १/२ टी स्पून हळद
- चिमुटभर हिंग
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
१) आळूची पानं स्वच्छ धुवून, पुसून घ्या व त्याची देठं काढून घ्या. पानाच्या मागच्या बाजूवर लाटणे फिरवून शिरा सारख्या करा. जाड शिरा सुरीने काढून टाका, पान फाटणार नाही याची काळजी घ्या.
२) एका भांड्यात चणाडाळीचे पीठ, तांदूळाचे पीठ, आलं-मिरचीची पेस्ट, लाल तिखट, गोडा मसाला, चिंचेचा कोळ, बारीक चिरलेला गुळ, तीळ, हळद, चिमुटभर हिंग व चवीनुसार मीठ घाला. लागेल तसे पाणी घालून भजीच्या पीठापेक्षा थोडे घट्ट मिश्रण तयार करा.
(तयार मिश्रणातील तिखट-मीठाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यावे.)
३) आळूचे एक पान घेऊन पानाच्या मागच्या बाजूस वरील मिश्रण पसरवा. दुसरे पान लावताना पानाचे टोक वरील बाजूस येईल असे ठेवून पातळसर मिश्रण लावून घ्यावे. तिसरे पान लावताना पानाचे टोक खालील बाजूस ठेवून त्यावर पातळसर मिश्रण लावावे. एकावर एक अशी ४-५ पानं ठेवून मिश्रण लावून घ्यावे. मिश्रण लावलेली पानं कडेेेने दुमडुन त्यावर मिश्रण लावून पानांचा घट्ट रोल करा व दो-याने गुंडाळून घ्या. उरलेल्या पानांचे असेच रोल करून घ्या.
४) एका चाळणीत ठेवून कुकरमध्ये १५-२० मिनिटे वाफवा. मोदकपात्रात सुध्दा उंडे वाफवू शकता. गार झाल्यावर वड्या कापून गरम तेलात तळा.
Favorite. .yummu .. yummy
ReplyDeleteThanks
ReplyDelete