केळ्याची कोशिंबीर

आपण बरेचदा बाजारातून केळी आणतो. कधी केळी नुसतीच खातो तर कधी शिकरण करायला वापरतो. केळ्याची कोशिंबीर सुध्दा छान लागते. बरेच जण करतातही. आमच्याकडे  हा प्रकार  सगळ्यांनाच आवडतो. खास महाराष्ट्रीयन स्वादिष्ट पदार्थ. उपासाकरिता चालणारी व पटकन होणारी अशी सोपी रेसिपी देत आहे.

साहित्य :

  • २ मध्यम आकाराची पिकलेली केळी
  • २-३ टेबलस्पून साखर
  • १/२ वाटी खोवलेला नारळ 
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • १ वाटी सायीचे/गोड दही 
  • चवीनुसार मीठ 

कृती:

१) केळ्याची सालं काढून सुरीने मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

२) एका भांड्यात केळीचे तुकडे, साखर, खोवलेला  नारळ, कोथिंबीर, सायीचे/गोड दही व चवीनुसार मीठ घालून मिश्रण सारखे करून घ्या. आवडत असल्यास त्यात १ चिरलेली हिरवी मिरची घाला. तयार कोशिंबीर  लगेचच सर्व्ह करा .




Comments

Popular Posts