शेपूची भाजी

शेपूच्या उग्र वासामुळे अनेकजण शेपूची भाजी खात नाहीत. शेपूची भाजी पचायला हलकी असते. शेपूमध्ये कॅल्शियम व आयर्न आढळते. शेपूची भाजी खाल्याने रक्तशर्करा नियंत्रणात राहते. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी यासारख्या तक्रारीवर शेपू गुणकारी आहे. स्त्रियांनी तर आपल्या आहारात शेपू अवश्य खावा. शेपूच्या भाजीने पचनशक्ती वाढविण्यासाठी मदत होते तसेच हाडं मजबुत करण्यासाठी सुध्दा शेपूची भाजी उपयुक्त आहे. शेपूची भाजी खाण्याचे अनेक फायदे माझ्या वाचनात आले आहेत. अशी उपयुक्त भाजी सगळ्यांनी जरूर खाल्ली पाहिजे. मी शेपूची भाजी भिजवलेले मूगडाळ, कांदा व लसूण घालून परतून करते.

रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.

साहित्य:


  • १ मध्यम शेपूची जुडी
  • १ मोठा कांदा बारीक चिरून
  • ६-७ लसुण पाकळ्या (बारीक चिरून)
  • २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • १/२ वाटी भिजवलेली मूगडाळ
  • १/२ चमचा साखर
  • मीठ चवीनुसार

फोडणीकरिता:

  • १/४ वाटी तेल
  • १/४ चमचा मोहरी
  • १/४ चमचा हळद
  • चिमुटभर हिंग

कृती:

१) शेपूची भाजी निवडून चाळणीत धुवून ठेवा. पाणी निथळल्यावर थोड्या वेळाने भाजी बारीक चिरून घ्या.

२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हळद व हिंग घालून फोडणी करा. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे व बारीक चिरलेला लसुण घाला. लसुण लालसर झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून २-३ मिनिटे परता. भिजवलेली मूगडाळ घालून पुन्हा २-३ मिनिटे परतून घ्या. त्यात चिरलेली शेपूची भाजी, साखर व चवीनुसार मीठ घालून भाजी ढवळा. भाजी थोड्या थोड्या वेळाने मध्यम आचेवर परतत राहा. भाजी कोरडी झाल्यावर गॅस बंद करा.

३) तयार भाजी भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.





Comments

Post a Comment

Popular Posts