मटकीच्या डाळीची आमटी

आज पुन्हा एकदा माझ्या आईने शिकवलेली व माझी आवडती रेसिपी देत आहे. एक आमटीचा प्रकार. मटकीची डाळ याकरिता वापरली जाते. आपल्याला मटकीची डाळ  किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते. त्याकरिता लागणारे साहित्य व कृती आपण पाहूया.

साहित्य:


  • मटकीची डाळ १ वाटी
  • बारीक चिरलेला १ मध्यम कांदा 
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर 
  • खोवलेला नारळ १/२ वाटी
  • ३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरून
  • १-२ हिरव्या मिरचीचे तुकडे
  • किसलेले आले १/२ चमचा
  • तेल २ टे. स्पून
  • मोहरी १/४ टी. स्पून फोडणीकरिता 
  • हळद १/४ टी स्पून
  • लाल तिखट १/२ टी स्पून
  • थोडासा गोडा मसाला
  • १ टे. स्पून गुळ
  • जिरं-खोबरं कुटुन १ टे. स्पून 
  • १-२ आमसुले / कोकम
  • हिंग चिमूटभर
  • मीठ चवीनुसार


कृती:

१)मटकीची डाळ धुवुन घ्या त्यात २ वाट्या पाणी घालुन कुकर मध्ये शिजवून घ्या.

२)कुकर गार झाला की डाळ काढून घ्या. त्यात कुटलेलं जिरं-खोबरं घाला.

३) एका कढईत तेल तापवा. त्यात मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, चिरलेला लसूण, मिरचीचे तुकडे, किसलेले आले व चिरलेला कांदा घाला. मिश्रण परतून घ्या.

४) शिजवलेली मटकीची डाळ घाला व उकळू द्या.

५) त्यात खोवलेला नारळ, कोथिंबीर, मीठ, गुळ आमसुले व गोडा मसाला घाला.

६) आमटी उकळू द्या घट्टसर झाली की, गॅसवरून उतरवा. गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करा.




Comments

Popular Posts