भरली वांगी
प्रत्येकाला बहुतेक आवडणारा व महाराष्ट्रात सगळीकडे आवडीने खाल्ला जाणारा गावरान प्रकार भरली वांगी व भाकरी. वेगवेगळ्या पध्दतीने भरली वांगी केली जातात. भाजीत १-२ चमचे तीळकूट घातले तर चव अजून छान लागते. तसेेच यात थोडासा चिंचेचा कोळ घालून सुध्दा भाजी करतात. भाजी करतांना तिखट व मीठाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या.आमच्याकडे सगळ्यांना भरली वांगी खुप आवडतात.
साहित्य:
१) काटेरी वांगी धुवून घ्यावीत. वांग्याचे वरील देठ काढून वांग्याला दोन उभ्या चिरा द्याव्यात. बटाट्याची सालं काढून मध्यम आकाराचा फोडी करून घ्या. एका भांड्यात पाणी घालून त्यात वांगी व बटाटे ठेवावेत.
२) एका थाळीत किंवा खोलगट भांड्यात खोवलेला नारळ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला गूळ, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, गोडा/काळा मसाला, हळद, कांदा लसूण मसाला (ऐच्छिक) व चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या.
३) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या. त्यात चिरलेली वांगी व बटाटे घाला. एकत्र केलेला मसाला घालून मिश्रण कढईत घालून ३-४ मिनिटे परतून घ्या, नंतर त्यात २ वाट्या पाणी घाला व त्यात लसूण पाकळ्या व आल्याचा तुकडा खलबत्त्यात ठेचून भाजीत घाला. कढईवर एक झाकण ठेवून भाजी घट्टसर शिजवून घ्या.
४) तयार भाजी भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.
साहित्य:
- ४-५ छोटी काटेरी वांगी
- १-२ मध्यम आकाराचे बटाटे
- १ वाटी खोवलेला नारळ
- १ वाटी बारीक चिरलेला कांदा
- १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ
- २ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट
- १ चमचा लाल तिखट
- २ चमचे गोडा/काळा मसाला
- १/४ चमचा हळद
- ५-६ लसूण पाकळ्या
- १ छोटासा आल्याचा तुकडा
- १ चमचा कांदा लसूण मसाला (ऐच्छिक)
- मीठ चवीनुसार
कृती:
- ३-४ टेबलस्पून तेल (आवडीनुसार कमी जास्त घ्या.)
- १/४ चमचा मोहरी
- १/४ चमचा हळद
- चिमुटभर हिंग
१) काटेरी वांगी धुवून घ्यावीत. वांग्याचे वरील देठ काढून वांग्याला दोन उभ्या चिरा द्याव्यात. बटाट्याची सालं काढून मध्यम आकाराचा फोडी करून घ्या. एका भांड्यात पाणी घालून त्यात वांगी व बटाटे ठेवावेत.
२) एका थाळीत किंवा खोलगट भांड्यात खोवलेला नारळ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेला गूळ, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, गोडा/काळा मसाला, हळद, कांदा लसूण मसाला (ऐच्छिक) व चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या.
३) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या. त्यात चिरलेली वांगी व बटाटे घाला. एकत्र केलेला मसाला घालून मिश्रण कढईत घालून ३-४ मिनिटे परतून घ्या, नंतर त्यात २ वाट्या पाणी घाला व त्यात लसूण पाकळ्या व आल्याचा तुकडा खलबत्त्यात ठेचून भाजीत घाला. कढईवर एक झाकण ठेवून भाजी घट्टसर शिजवून घ्या.
४) तयार भाजी भाकरी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.
रेसिपी आवडली तर लाईक व कमेंट नक्की करा.
Yummy yummy
ReplyDeleteThanks Aparna
ReplyDelete