थालीपीठाच्या भाजणीचे वडे व चटणी
थालिपीठाची भाजणी वापरून अतिशय पौष्टीक असे पदार्थ पटकन करता येतात. तयार भाजणी २-३ महिने सहज टिकते. आपल्या आवश्यकतेनुसार वापरु शकतो .
- ५०० ग्राम ज्वारी
- ५०० ग्राम बाजरी
- २५० ग्राम तांदुळ
- २५० ग्राम हरभरे
- १२५ ग्राम हिरवे मुग
- उडीद १/२ वाटी
- मटकी १/२ वाटी
- मसुर १/२ वाटी
- गहु १/२ वाटी
- १२५ ग्राम धने
- मेथीदाणे १ टी .स्पून
- जिरं १ टी .स्पून
१) वरील सगळी धान्ये वेगवेगळी भाजुन घ्यावीत.
२) गिरणीतुन थोडीशी जाडसर दळून आणावित. एका घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावी.
भाजणीचे वडे करायला लागणारे साहित्य:
- ४ वाट्या थालिपीठाची भाजणी
- ६-७ हिरव्या मिरच्या वाटलेल्या
- २ टे .स्पून तीळ
- १/२ चमचा ओवा
- १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- थोडेसे लाल तिखट
- थोडीशी हळद
- थोडा हिंग
- चवीनुसार मीठ
- वडे तळायला तेल आवश्यकतेनुसार
१) एका भांड्यात थालिपीठाची भाजणी घ्या. त्यात वाटलेल्या हिरव्या मिरच्या, तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर,थोडेसे लाल तिखट, हळद, हिंग व चवीनुसार मीठ घाला. थोडे थोडे पाणी घालून गोळा मळून घ्या.
२) लिंबाएवढा गोळा घेऊन केळीच्या पानावर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवर थोडे तेल लावून छोट्या पुरीच्या आकाराचे वडे थापून त्याला मध्यभागी एक भोक पाडा.
२) एका कढईत तेल तापवून तयार वडे मध्यम आंचेवर तळून घ्या.
नारळाची चटणी
साहित्य :
- १ वाटी खोवलेला नारळ
- २-३ लसुण पाकळ्या
- १-२ हिरव्या मिरच्या
- १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
- ७-८ कडिपत्याची पाने
- १/२ चमचा जिरं
- थोडेसे आलं
- १/२ लिंबाचा रस
- १/२ चमचा साखर
- मीठ चवीनुसार
वरील साहित्य एकत्र करून चटणी वाटा.
गरम-गरम तयार वडे गोड दह्याबरोबर व चटणी बरोबर सर्व्ह करा.
Comments
Post a Comment