उकडीची नाचणीची भाकरी व पिठलं
उकडीची नाचणीची भाकरी त्यावर मस्त साजुक तुप, गरम-गरम पिठलं, शेंगदाण्याच्या कुटाची चटणी व कच्चा कांदा आजच्या जेवणाचा बेत.
उकडीची नाचणीची भाकरी
साहित्य:
१) एका भांड्यात १ वाटीपेक्षा थोडेसे कमी पाणी उकळत ठेवा. चवीपुरते मीठ घाला. पाणी उकळल्यावर त्यात १ वाटी नाचणीचे पीठ घाला व ढवळुन गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवा.
२) १० मिनिटांनी झाकण काढा. एका ताटलीत तयार उकड काढुन घ्या. उकड कोमट झाली कि, उकडीला थोडे तेल लावून मळा. (मळतांना आवश्यकतेनुसार थोडे पाणी लावून मळा.) तयार उकडीचा गोळा घेऊन पोलपाटावर लाटण्याने भाकरी लाटा.
३) तयार भाकरीच्या दोन्ही बाजू तव्यावर शेका. ( आवश्यकता वाटली तर विस्तवावर शेका.)
(त्यावर मस्त साजुक तुप घाला व सर्व्ह करा.)
पिठलं
साहित्य:
कृती:
१) एका भांड्यात चणाडाळीचे पीठ, शेंगदाण्याचे कूट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घ्या. त्यात पाणी घालुन पीठ भिजवुन घ्या. (भजीच्या पीठाप्रमाणे)
२) एका कढईत तेल तापवा. त्यात मोहरी , थोडेसे जिरं, थोडीशी हळद, थोडासा हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कडिपत्याची पाने व लसुण पाकळ्या चिरून किंवा ठेचून घाला.
३) त्यात चणाडाळीच्या पीठाचे तयार मिश्रण घालून मिश्रण सतत ढवळत रहा. (२-३ मिनिटे) मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. घट्टसर झाले की, गॅस बंद करा.
४) तयार पिठल्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा खोवलेला नारळ घालून भाकरी बरोबर सर्व्ह करा.
शेंगदाण्याच्या कुटाची चटणी
गॅसवर तवा तापवून त्यात १-२ चमचे तेल घाला. त्यात शेंगदाण्याचे कुट, थोडे लाल तिखट (आवडीनुसार), थोडे मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून १-२ मिनिटे परतुन गॅस बंद करा. पटकन चटणी
(ही चटणी भाकरी किंवा पोळीबरोबर सुद्धा मस्त लागते. शेंगदाण्याची चटणी माझ्या नागपूरच्या बहिणीने शिकवली आहे.)
उकडीची नाचणीची भाकरी
साहित्य:
- नाचणीचे पीठ १ वाटी
- पाणी १ वाटी
- मीठ चवीपुरते
- थोडेसे तेल
१) एका भांड्यात १ वाटीपेक्षा थोडेसे कमी पाणी उकळत ठेवा. चवीपुरते मीठ घाला. पाणी उकळल्यावर त्यात १ वाटी नाचणीचे पीठ घाला व ढवळुन गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवा.
२) १० मिनिटांनी झाकण काढा. एका ताटलीत तयार उकड काढुन घ्या. उकड कोमट झाली कि, उकडीला थोडे तेल लावून मळा. (मळतांना आवश्यकतेनुसार थोडे पाणी लावून मळा.) तयार उकडीचा गोळा घेऊन पोलपाटावर लाटण्याने भाकरी लाटा.
३) तयार भाकरीच्या दोन्ही बाजू तव्यावर शेका. ( आवश्यकता वाटली तर विस्तवावर शेका.)
(त्यावर मस्त साजुक तुप घाला व सर्व्ह करा.)
पिठलं
साहित्य:
- चणाडाळीचे पीठ १ वाटी
- १ चमचा लाल तिखट
- १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
- ५-६ कडिपत्याची पाने
- ३-४ लसुण पाकळ्या (ठेचून किंवा तुकडे )
- १ चमचा शेंगदाण्याचे कूट
- फोडणी करिता १ डाव तेल, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरं, थोडीशी हळद, थोडासा हिंग
- मीठ चवीनुसार
- थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा खोवलेला नारळ
कृती:
१) एका भांड्यात चणाडाळीचे पीठ, शेंगदाण्याचे कूट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घ्या. त्यात पाणी घालुन पीठ भिजवुन घ्या. (भजीच्या पीठाप्रमाणे)
२) एका कढईत तेल तापवा. त्यात मोहरी , थोडेसे जिरं, थोडीशी हळद, थोडासा हिंग, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कडिपत्याची पाने व लसुण पाकळ्या चिरून किंवा ठेचून घाला.
३) त्यात चणाडाळीच्या पीठाचे तयार मिश्रण घालून मिश्रण सतत ढवळत रहा. (२-३ मिनिटे) मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. घट्टसर झाले की, गॅस बंद करा.
४) तयार पिठल्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडासा खोवलेला नारळ घालून भाकरी बरोबर सर्व्ह करा.
शेंगदाण्याच्या कुटाची चटणी
गॅसवर तवा तापवून त्यात १-२ चमचे तेल घाला. त्यात शेंगदाण्याचे कुट, थोडे लाल तिखट (आवडीनुसार), थोडे मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून १-२ मिनिटे परतुन गॅस बंद करा. पटकन चटणी
(ही चटणी भाकरी किंवा पोळीबरोबर सुद्धा मस्त लागते. शेंगदाण्याची चटणी माझ्या नागपूरच्या बहिणीने शिकवली आहे.)
Comments
Post a Comment