दहि-दुध-पोहे
खुप जणांना माहित असलेली व आवडणारी रेसिपी. लहानपणी भूक लागली की, आई पटकन दहि-दुध-पोहे हमखास करून द्यायची आणि आम्ही तितक्याच आवडीने खायला तयार असायचो. हळुहळु असे पदार्थ करणं बंद होतंय. पण खरंच, हे पदार्थ मुलांनी खाल्ले पाहिजेत. माझ्या मुली दहि-दुध-पोहे आवडीने खातात. हा एक अतिशय पौष्टिक, सात्विक व पोटभरीचा पदार्थ आहे. रेडीमेड पॅकेटमधील २ मिनिटांत तयार होणारा कुठलाही पदार्थ करण्यापेक्षा मुलांना असा २ मिनिटांत तयार होणारा घरगुती पदार्थ खायला देणे जास्त चांगले, नाही का? आई घरात नसतांना सुध्दा मुलं आपल्या हाताने सहज करून खाऊ शकतात. दहि-दुध-पोहे करायला सोपे असून हे करतांना गॅस लावायची गरज लागतच नाही. तर पाहूया दहि-दुध-पोहे करायची साधी व सोपी रेसिपी.
साहित्य:
कृती:
१) एका चाळणीत जाडे पोहे घेऊन पाण्याने धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढुन टाका.(पातळ पोहे घेतल्यास पोहे धुवायची गरज नाही.)
२) पातळ पोहे किंवा धुतलेले पोहे एका भांड्यात काढून घ्या. त्यात साखर, मीठ, विरजलेले सायीचे दही किंवा १ चमचा दहि व २-३ चमचे जाड साय घाला. त्यात पोहे भिजतील इतकेच गार दुध घालून मिश्रण एकत्र करा. मिश्रण थोडे सैलसर करा. एका बाऊलमध्ये काढून मुलांना सर्व्ह करा.
साहित्य:
- ३-४ वाट्या जाडे पोहे ( पातळ पोहे सुध्दा घेऊ शकता.)
- ३-४ चमचे साखर
- २-३ चिमुट मीठ
- २-३ चमचे विरजलेले सायीचे दही/ १ चमचा दहि व २-३ चमचे जाड साय
- दुध आवश्यकतेनुसार
कृती:
१) एका चाळणीत जाडे पोहे घेऊन पाण्याने धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढुन टाका.(पातळ पोहे घेतल्यास पोहे धुवायची गरज नाही.)
२) पातळ पोहे किंवा धुतलेले पोहे एका भांड्यात काढून घ्या. त्यात साखर, मीठ, विरजलेले सायीचे दही किंवा १ चमचा दहि व २-३ चमचे जाड साय घाला. त्यात पोहे भिजतील इतकेच गार दुध घालून मिश्रण एकत्र करा. मिश्रण थोडे सैलसर करा. एका बाऊलमध्ये काढून मुलांना सर्व्ह करा.
Comments
Post a Comment