खव्याचे मोदक

साहित्य:

कव्हरकरिता:

  • गव्हाचे पीठ १ वाटी
  • २ टे. स्पुन रवा
  • मीठ चिमुटभर
  • २ लहान चमचे तेल
  • कणिक भिजवण्यासाठी पाणी आवश्यकतेनुसार

कृती:

वरील साहित्य एकत्र करा. त्यावर २ लहान चमचे गरम तेलाचे मोहन घालुन घट्ट कणिक भिजवुन घ्या. तयार कणकेचे छोटे छोटे गोळे करा.

सारणासाठी:
  • खवा १०० ग्रॅम
  • ३-४ टे. स्पुन पीठीसाखर (कमी-जास्त घेऊ शकता.)
  • ५-६ बदाम, ५-६ काजु, ५-६ पिस्ते व थोडीशी वेलचीची व जायफळ पावडर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.

  • मोदक तळण्यासाठी रिफाईंड तेल / तुप


कृती:

१) खवा मिक्सरमध्ये किंवा हाताने मोकळा करून घ्या .

२) मध्यम आचेवर एका नाॅन-स्टीकच्या पॅनमध्ये मोकळा केलेला खवा भाजून घ्या. गॅस बंद करून त्यात काजु-बदाम व पिस्त्याची तयार पावडर घाला.

३) तयार मिश्रण गार झाले की, त्यात पीठीसाखर घालुन मिश्रण एकत्र करा.

४) तयार कणकेचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याची पुरी लाटुन त्यात तयार सारण भरून त्याचा मोदक करून घ्या.

५) तयार मोदक रिफाईंड तेलात / तुपात तळुन घ्या.



Comments

Popular Posts