काला जाम

नवरात्राच्या सगळ्यांना शुभेच्छा. सगळीकडे नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. अनेक जण अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोस्तव साजरा करतात. काही ठिकाणी घट बसविले जातात तर काही जण अखंड नंदादीप लावून व देवीला फुलांच्या माळा वाहून देवीची पुजा करतात. घरात गोडा-धोडाचा स्वयंपाक केला जातो . सगळीकडे मंगलमय वातावरण असते. रोज देवीची आरती केली जाते व  देवीला नैवैद्य दाखवला जातो. खास नैवैद्यासाठी आज मी काला जाम या पदार्थाची रेसिपी देत आहे.   

साहित्य:

  • /२ लिटर दुधाचे पनीर
  • १०० ग्रॅम मावा
  • ६-७ टी. स्पून आरारूट किंवा मैदा
  • १/२ टी. स्पून सोडा
  • १ टी. स्पून रवा
  • २ टी. स्पून पीठीसाखर
  • ७-८ थेंब लाल रंग
  • तळण्यासाठी रिफाईंड तेल/ तुप
  • पाकासाठी २ कप साखर व २ कप पाणी


कृती:

१) मावा, पनीर, आरारूट/मैदा, पीठीसाखर, रवा, सोडा, लाल रंग एकत्र करून मळुन घ्या व त्याचे मध्यम आकाराचे गोळे करा.

२) एका कढईत तेल/तुप तापवून तयार गोळे लालसर तळुन घ्या.

३) २ कप साखर व २ कप पाणी घालुन पाक करा.

४) गरम पाकात तळलेले गुलाबजाम टाका. ५-६ तास मुरूल्यावर सर्व्ह करा.



रेसिपी आवडली तर नक्की कंमेंट व लाईक करा. 

Comments

Post a Comment

Popular Posts