नाचणीची इडली व चटणी
नाचणीत (नागली / रागी) कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन डी असते. नाचणी खाल्याचे बरेच फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी, रक्तवाढीसाठी व विशेष करून मधुमेह असणार्यांनी आपल्या आहारात नाचणी खावी असे माझ्या वाचनात आले आहे. अश्या या उपयुक्त नाचणीचा फायदा सगळ्यांनीच घेतला पाहिजे. आपल्या आहारात नाचणीचा समावेश होत नाही. वेगवेगळ्या पदार्थ करतांना नाचणी वापरली तर त्याचा उपयोग आपल्याला होईल. बाजारात नाचणीचे पीठ, नाचणीचे सत्व, नाचणीचा रवा मिळतो. त्यापैकी नाचणीचा रवा वापरून मी इडली केली व छान झाली. आज नाचणीच्या इडलीची रेसिपी देत आहे.
साहित्य:
१) इडलीचा रवा व उडिदडाळ धुवून वेगवेगळी भिजवा. (७-८तास) उडिदडाळीतच मेथीदाणे सुध्दा भिजवा.
२) इडलीचा रवा व उडिदडाळ वाटण्यापूर्वी ३-४ तास अगोदर नाचणीचा रवा भिजवा.( नाचणीचा रवा लवकर भिजतो म्हणून उशीरा भिजवणे) इडलीचा रवा, उडिदडाळ, मेथीदाणे व नाचणीचा रवा एकत्र करून धुवून मिक्सरवर बारीक वाटा.
३) एका मोठ्या पातेलीत वाटलेले इडली पीठ आंबवण्यास ठेवा. (७-८ तास)
४) इडली करतांना तयार पिठात आपल्या चवीनुसार मीठ घालुन मिश्रण एकत्र करा.
५) इडली पात्राला तेल लावून इडलीचे पीठ घालून इडल्या वाफवून घ्या. थोड्या कोमट झाल्यावर एका भांड्यात इडल्या काढून घ्या.
चटणीसाठी साहित्य:
वरील साहित्य एकत्र करून चटणी वाटा. आवडत असल्यास १ टे. स्पुन तेल तापवून त्यात थोडे जिरं, मोहरी, हिंग व ३-४ कडिपत्याची पाने घालून फोडणी करा व चटणीवर घाला. तयार इडल्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
रेसिपी आवडल्यास लाईक व कंमेंट जरूर करा.
साहित्य:
- २ वाट्या इडलीचा रवा
- १ वाटी नाचणीचा रवा
- दिड वाटी उडिदडाळ
- १/२ चमचा मेथीदाणे
- थोडेसे तेल
१) इडलीचा रवा व उडिदडाळ धुवून वेगवेगळी भिजवा. (७-८तास) उडिदडाळीतच मेथीदाणे सुध्दा भिजवा.
२) इडलीचा रवा व उडिदडाळ वाटण्यापूर्वी ३-४ तास अगोदर नाचणीचा रवा भिजवा.( नाचणीचा रवा लवकर भिजतो म्हणून उशीरा भिजवणे) इडलीचा रवा, उडिदडाळ, मेथीदाणे व नाचणीचा रवा एकत्र करून धुवून मिक्सरवर बारीक वाटा.
३) एका मोठ्या पातेलीत वाटलेले इडली पीठ आंबवण्यास ठेवा. (७-८ तास)
४) इडली करतांना तयार पिठात आपल्या चवीनुसार मीठ घालुन मिश्रण एकत्र करा.
५) इडली पात्राला तेल लावून इडलीचे पीठ घालून इडल्या वाफवून घ्या. थोड्या कोमट झाल्यावर एका भांड्यात इडल्या काढून घ्या.
चटणीसाठी साहित्य:
- १ वाटी खोवलेला नारळ
- २-३ लसुण पाकळ्या
- १-२ हिरव्या मिरच्या (कमी-जास्त आपल्या आवडीनुसार घेऊ शकता.)
- १/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
- ७-८ कडिपत्याची पाने
- १/२ चमचा जिरं
- थोडेसे आलं
- १/२ लिंबाचा रस / १ चमचा दही
- १/२ चमचा साखर
- मीठ चवीनुसार
वरील साहित्य एकत्र करून चटणी वाटा. आवडत असल्यास १ टे. स्पुन तेल तापवून त्यात थोडे जिरं, मोहरी, हिंग व ३-४ कडिपत्याची पाने घालून फोडणी करा व चटणीवर घाला. तयार इडल्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
रेसिपी आवडल्यास लाईक व कंमेंट जरूर करा.
Comments
Post a Comment