हिरव्या हरभ-याची उसळ




साहित्य:
  • २०० ग्रॅम हरभरे
  • १ मध्यम आकाराचा कांदा चिरलेला
  • १ टोमॅटो चिरलेला
  • ५-६ लसुण पाकळ्या व थोडेसे आलं
  • १-२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • १/२ टीस्पून लाल तिखट (ऐच्छिक)
  • १ टीस्पून धने पावडर
  • १/४ टीस्पून जिरं पावडर
  • ५-६ कडिपत्याची पानं
  • १/२ टीस्पून साखर 
  • २-३ टेबलस्पून तेल
  • फोडणीसाठी थोडीशी मोहरी,हिंग, हळद
  • मीठ चवीनुसार

कृती:

१) एका भांड्यात ८-१० तास हिरवे हरभरे पाण्यात  भिजवा. प्रमाणात पाणी व थोडेसे मीठ घालून हरभरे कुकरमध्ये (३-४ शिट्या करा) शिजवून घ्या.

२) एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात चिरलेला कांदा घालून परता. कांदा लालसर झाल्यावर कडिपत्याची पानं व टोमॅटो घालून परता. शिजवलेले हरभरे व थोडेसे पाणी घाला व उकळी येऊ द्या. त्यात धने पावडर, जिरं पावडर, लाल तिखट, साखर, काश्मिरी लाल तिखट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं व लसुण पाकळ्या ठेचून घालाव्या. चवीनुसार मीठ घाला, घट्टसर झाल्यावर गॅस बंद करा. गरमगरम पोळी बरोबर हरभरा उसळ सर्व्ह करा.

Comments

Popular Posts