मटकीची उसळ



साहित्य:
  • २०० ग्रॅम मोड आलेली मटकी
  • १ मध्यम कांदा चिरलेला
  • १ टोमॅटो चिरलेला
  • १ टेबलस्पून गूळ
  • १ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट
  • १ टेबलस्पून गोडा मसाला
  • १ टीस्पून लाल तिखट
  • थोडासा खोवलेला नारळ
  • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/२ लिंबू
  • मीठ चवीनुसार
फोडणीसाठी:
  • २-३ टेबलस्पून तेल
  • १/४ टीस्पून मोहरी
  • थोडीशी हळद व चिमुटभर हिंग
  • ५-६ कडिपत्याची पानं
१) एका भांड्यात तेल तापवून त्यात मोहरी, हळद, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करा. त्यात चिरलेला कांदा घालून परता. चिरलेला टोमॅटो घालून परता. मोड आलेली मटकी घालून मिश्रण एकत्र करून घ्या. थोडेसे पाणी घालून त्यावर झाकण ठेवून मटकी शिजवून घ्या.

२) मटकी शिजल्यावर त्यात गूळ, शेंगदाण्याचं कूट, गोडा मसाला, लाल तिखट, खोवलेला नारळ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे पाणी घालून मिश्रण उकळून घ्या. थोडे दाटसर झाल्यावर गॅस बंद करा व उसळ सर्व्ह करतांना लिंबाची फोड, खोवलेला नारळ व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 


(आवडत असल्यास उसळ करतांना  १/२ वाटी भिजवलेले शेंगदाणे मटकी बरोबर घालून शिजवून घ्या, छान लागतात.)

Comments

Popular Posts