चिक्कू मिल्कशेक विथ चिक्कू आइस्क्रीम




चिक्कू आइस्क्रीम करिता:

साहित्य:
  • १ लिटर घट्ट दुध
  • २०० ग्रॅम साखर
  • १५०-२०० ग्रॅम क्रिम
  • २०० ग्रॅम चिक्कूचा गर
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • २ टेबलस्पून व्हॅनिला कस्टर पावडर
  • २ टेबलस्पून काॅर्नप्लोअर
  • १ टीस्पून जिलेटिन
कृती:

१) दुध तापवून गार करून त्यातील सायं काढून ठेवा.

२) काॅर्नप्लोअर व व्हॅनिला कस्टर पावडर थोड्या थंड दुधात एकत्र करून ठेवा.

२) एका पातेल्यात दुध तापत ठेवा. दुध सतत ढवळत रहा. १ लिटर दुधाचे पाऊण लिटर होईपर्यंत आटवा. नंतर त्यात साखर व जिलेटिन घालून ५-६ मिनिटे उकळवा. मिश्रण सतत ढवळत रहा. दुधात एकत्र केलेले काॅर्नप्लोअर व व्हॅनिला कस्टर पावडर मिश्रणात घालून मिश्रण पुन्हा ३-४ मिनिटे उकळवा. मिश्रण उकळवतांना सतत ढवळत रहा. 

३) तयार मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये एकदा फिरवून आइस्क्रीम टिनमध्ये ७-८ तास सेट करत ठेवा. ७-८ तासानंतर तयार मिश्रणात क्रिम घालून मिश्रण बीटरने मिक्स करा. चिक्कूचा गर व व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा एकदा फेटा.

४) आइस्क्रीम टिनमध्ये मिश्रण सेट करायला ठेवा. व्यवस्थित झाकण लावून ८-१० तास सेट करत ठेवा. सेट झाल्यावर सर्व्ह करा. 


चिक्कू मिल्कशेक करिता

साहित्य:
  • १ लिटर दुध
  • ६-७ चिक्कू
  • ६-७ टेबलस्पून साखर
  • १/२ कप क्रिम/ सायं
कृती:

१) दुध तापवून गार करून घ्या.

२) चिक्कूची सालं व बिया काढून चिक्कूच्या बारीक फोडी करून घ्या.

३) मिक्सरच्या भांड्यात चिक्कूच्या फोडी व साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यात दुध व क्रिम घालून पुन्हा मिक्सरमध्ये एकत्र करा व एका पातेल्यात काढून फ्रिझमध्ये गार करायला ठेवा.

(साखर व क्रिम आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापरा. )

चिक्कू मिल्कशेक विथ चिक्कू आइस्क्रीम सर्व्ह करतांना:

एका ग्लासमध्ये चिक्कू मिल्कशेक त्यावर स्कूपने/पळीने आइस्क्रीम घाला. वरून चिक्कूचे बारीक तुकडे घालून सजवा व सर्व्ह करा. 

Comments

Post a Comment

Popular Posts