कारळ्याची चटणी / खुरासणीची चटणी




साहित्य:

१ वाटी कारळे/खुरासणी
१/२ वाटी सुकं खोबरं (किसलेले)
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ वाटी तीळ
१०-१२ कडिपत्याची पानं
१ टेबलस्पून लाल तिखट
थोडेसे तेल
चवीनुसार मीठ

कृती:

१) एका कढईत कारळे, सुकं खोबरं, शेंगदाणे, तीळ वेगवेगळे भाजून घ्या. १/४ चमचा तेलावर कडिपत्याची पानं तळून घ्या.

२) मिक्सरच्या भांड्यात कारळे, सुकं खोबरं, शेंगदाणे, तीळ, लाल तिखट, कडिपत्याची पानं व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून चटणी वाटा.

३) सर्व्ह करतांना चटणीमध्ये थोडे तेल घालून भाकरी किंवा पोळीबरोबर द्या. 

Comments

Post a Comment

Popular Posts